शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
3
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
4
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
7
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
8
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
9
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
10
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
11
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
12
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
13
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
14
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
15
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
17
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
18
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
19
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
20
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल

लोणावळ्यात भाजपचा स्वबळाचा नारा; पहिली यादी जाहीर, राष्ट्रवादी ही स्वबळावर लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:23 IST

पुढील दोन दिवसांत उर्वरित उमेदवार व नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येणार

लोणावळा : मागील काही दिवसांपासून लोणावळा शहरात युती आणि आघाडीसंदर्भात तर्कवितर्क सुरू असताना भाजपने अकरा उमेदवारांची यादी रविवारी रात्री जाहीर केली. आमदार सुनील शेळके यांचे समर्थक असलेल्या उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिल्याने शहरातील राजकारणाला नवे वळण लागणार आहे.लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप ताकदीनिशी सज्ज झाली असून, ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. लोणावळा शहरामध्ये केवळ भाजप या एकमेव पक्षाकडे १३ प्रभागांसाठी व नगराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवार असून, पुढील दोन दिवसांत उर्वरित उमेदवार व नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा पक्षाकडून केली जाईल, अशी माहिती माजी राज्यमंत्री व निवडणूक प्रभारी संजय तथा बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.शेळके यांच्या गटाची उमेदवार चाचपणीआमदार सुनील शेळके यांच्या गटाकडे अद्यापही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि इतर मित्रपक्ष यांची मिळून शहरांमध्ये विकास आघाडी तयार करण्याचा मानस चर्चेत होता; परंतु आता अनेकजण भाजपच्या गोटात सामील झाले तर काँग्रेसने ही स्वबळाचा नारा दिला आहे. प्रभाग क्रमांक पाचमधून सुभाष दिनकर यांनी भाजप प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) लोणावळा शहरातील निवडणूक स्वबळावर लढणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपचे जाहीर उमेदवारप्रभाग क्र १ : सुधीर पारिटे व शुभांगी गोसावीप्रभाग क्र ५ : सुभाष डेनकर व बिंदा गणात्राप्रभाग क्र ६ : दत्तात्रेय येवले व रेश्मा पठारेप्रभाग क्र ७ : देविदास कडू व सुरेखाताई जाधवप्रभाग क्र ११ : रचना सिनकरप्रभाग क्र १२ : अभय पारख व विजयाताई वाळंज

English
हिंदी सारांश
Web Title : BJP declares solo fight in Lonavala; NCP to follow?

Web Summary : BJP announced candidates for Lonavala Municipal Council elections, signaling a solo fight. With Congress already declaring independence and some joining BJP, NCP's strategy is questioned. Election interest intensifies as candidates emerge.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेElectionनिवडणूक 2024PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक