शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: पुणे महापालिकेत सत्ता येणारच नाही; घोषणांचा काय उपयोग? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:32 IST

- ९९ रुपयांत वीज देण्याची घोषणा झाली, नंतर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीएमपीएमएल आणि मेट्रो मोफत करण्याबाबतही दादांनी नेमकं काय म्हणायचं आहे, हे माध्यमांनी एकदा स्पष्टपणे विचारावं.

पुणे - पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा सादर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपीएमएल बस आणि मेट्रो सेवा मोफत करण्याची मोठी घोषणा केली. मात्र या घोषणांवर भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका करत अजित पवारांना टोला लगावला आहे.पुण्यात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की,“महापालिकेत सत्ता येणारच नसेल तर काहीही घोषणा करायला काय हरकत आहे? जाहीरनामे हे पूर्ण करण्यासाठी नसतात, तर फक्त हमी देण्यासाठी असतात.” अजित पवार पूर्वीही अनेक वेळा घोषणांबाबत गोंधळात टाकणारी वक्तव्ये करत आले असल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, “९९ रुपयांत वीज देण्याची घोषणा झाली, नंतर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीएमपीएमएल आणि मेट्रो मोफत करण्याबाबतही दादांनी नेमकं काय म्हणायचं आहे, हे माध्यमांनी एकदा स्पष्टपणे विचारावं.”चंद्रकांत पाटील यांनी इतर राज्यांतील निवडणूक घोषणांचाही दाखला दिला. “निवडणूक जिंकण्याची शक्यता नसताना अशा प्रकारच्या लोकांना भुरळ घालणाऱ्या घोषणा केल्या जातात. बिहारमध्ये काँग्रेसने महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, त्यामागेही तेच गणित होतं,” असे ते म्हणाले.अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्यावर बोलताना पाटील म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या हे चांगलं आहे, पण आता पक्षाचं नाव काय असणार, हेही पाहावं लागेल.” पुणे महापालिकेत सत्ता मिळणार नसताना अशा मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्याची टीका करत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. दरम्यान, अजित पवार यांनी पुण्यातील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरमहा सुमारे साडेसात कोटी रुपयांचे इंधन वाया जाते, तर वार्षिक १० हजार ८०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान पुणेकरांना सहन करावे लागते. यावर उपाय म्हणून पीएमपीएमएल बस आणि मेट्रो मोफत करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला असून, यासाठी महापालिकेला दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपये खर्च येईल, मात्र प्रदूषणात मोठी घट होईल, असेही त्यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Powerless in Pune, Ajit Pawar's promises are futile: Chandrakant Patil

Web Summary : Chandrakant Patil criticized Ajit Pawar's free transport promise for Pune, questioning its feasibility given NCP's weak position in the Pune Municipal Corporation. He alleged such announcements are merely election ploys, citing past unfulfilled promises. Patil also commented on the merger of NCP factions, focusing on the party's future identity.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे