पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे आता प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरवात झाली आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदेसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार सुप्रिया सुळे , काँग्रेस, उद्धवसेना आणि मनसे यांच्या प्रचारसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मनसेचे प्रमुख राज ठाकरे पुण्यात येणार आहे. त्यामुळे प्रचार रॅली आणि जाहीर सभामधून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडकणार आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीच्या १६५ जागांसाठी १ हजार १६५ उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात राहिले आहेत. येत्या १३ जानेवारीपर्यंत या निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार आणि नेते जाेरात प्रचाराला लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात आठवडाभरापासून ठाण मांडुन आहेत. भाजपने उमेदवारी नाकारलेल्या माजी नगरसेवकांना राष्ट्रवादीने आयत्यावेळी संधी देउन निवडणुकीच्या रिगंणात उभे करून भाजपपुढे आव्हाने उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देण्यासाठी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी रणांगणात उतरविण्याचे नियोजन केले आहे. भाजपने पुण्यात फडणवीस यांच्या किमान दोन सभा आणि 'रोड शो'चे आयोजन करून प्रचाराचा राळ उठविण्याची व्यूहरचना आखली आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे प्रचारसाठी येणार आहेत. त्याचबरोबर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटी हे प्रमुख नेते निवडणुकीवर लक्ष ठेवुन आहेत. त्याबरोबर भाजपचे स्टारप्रचारकही प्रचारला येणार आहे.
शिंदेसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ९ जानेवारी पुण्यात येणार आहे. त्याच बरोबर शिंदसेनेचे मंत्री उदय सामंत, भरत गोगावले यासह अन्य काही मंत्री प्रचारासाठी येणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात आघाडी आहे. त्यामुळे या उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादी (शरद पवार) च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे प्रचारात उतरणार आहेत. काँग्रेस, उद्धवसेना आणि मनसे एकत्र निवडणूक लढवत आहे. उमेदवारांच्या प्रचारसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विश्वजित कदम आदी नेते प्रचारासाठी येणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची एकत्रित सभा पुण्यात घेण्याचे नियेाजन सुरू आहे. उद्धवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राउत, नेत्या सुषमा अंधारे, सचिन अहिर, अरविंद सावंत हे प्रचारासाठी येणार आहे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार
पुणे महापालिकेसाठी काँग्रेस, उद्धवसेना व मनसे हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची एकत्रित सभा पुण्यात घेण्याचे नियेाजन सुरू आहे.
Web Summary : Pune's election sees BJP, Shiv Sena, NCP, Congress, and MNS in fray. Key leaders like Fadnavis, Shinde, Pawar, Thackeray to rally. Intense campaigning expected.
Web Summary : पुणे चुनाव में बीजेपी, शिवसेना, एनसीपी, कांग्रेस और मनसे मैदान में। फडणवीस, शिंदे, पवार, ठाकरे जैसे प्रमुख नेता रैली करेंगे। जोरदार प्रचार की उम्मीद।