शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: भाजप - शिंदेसेना युतीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम; निवडणूक स्वबळावर लढवणार, ११८ उमेदवार रिंगणात – नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 10:17 IST

PMC Election 2026 शिंदेसेना आणि भाजप यांची युती व्हावी, ही पक्षाची पहिल्यापासूनच भूमिका होती. मात्र, जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही.

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेसेना यांच्यात युती होणार, या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर युती न झाल्याचे स्पष्ट झाले असून, शिंदेसेना ही निवडणूक स्वबळावर लढवत असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. 

गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पुणे महापालिकेसाठी शिंदेसेनेने सुरुवातीला १२५ उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. मात्र, विविध कारणांमुळे ७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात शिवसेनेचे एकूण ११८ उमेदवार आहेत. पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूकही शिंदेसेना स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपसोबत युती न होण्याबाबत बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, शिंदेसेना आणि भाजप यांची युती व्हावी, ही पक्षाची पहिल्यापासूनच भूमिका होती. मात्र, जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही. त्यामुळे दोन्ही महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा लागला. पुणे शहरासाठी स्वतंत्र ‘वचननामा’ लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यामध्ये शहराच्या सर्वांगीण विकासाची भूमिका आणि पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा मांडला जाणार आहे, असेही गोऱ्हे यांनी सांगितले. शिंदेसेनेच्या प्रचाराची सुरुवात आज, शुक्रवारी, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन होणार आहे. दरम्यान, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ९ तारखेला पुण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून, राज्यातील विविध आमदारही प्रचारासाठी पुण्यात येणार असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : PMC Election 2026: BJP-Shinde Sena alliance ends; contesting independently, says Neelam Gorhe.

Web Summary : Shinde Sena will contest Pune Municipal Corporation elections independently with 118 candidates. Alliance talks with BJP failed due to seat sharing disagreements. A development-focused manifesto will be released soon. Campaign starts with Uday Samant, Eknath Shinde's rally on 9th.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Neelam gorheनीलम गो-हेEknath Shindeएकनाथ शिंदेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीBJPभाजपा