पुणे : पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीवरून महायुती सरकारमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळत आहे. इथे प्रचारसभेतून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करू लागले आहेत. अजित पवारांनी पिंपरीतील आमदार, सत्ताधारी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांविरोधात थेट दंड थोपाटले आहेत.
अजित पवार यांनी काही वर्षांपूर्वी एका आमदारावर टीका केली होती. मी ठरवलं तर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. तू कसा आमदार होतो, तेच बघतो. असं ते म्हणाले होते. याचा आधार घेत आमदार महेश लांडगे यांनी जोरदार हल्लाबोल केला. आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी जर ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो, तर आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अरे आमच्या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहेत. याच तुझा कार्यक्रम करतील. तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या! अशी टीका महेश लांडगे यांनी केली होती.
महेश लांडगे यांनी एकेरी उल्लेख करत अजित पवारांवर टीका केली. त्याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना विचारले असता त्यांनी मिश्किल टिपण्णी करत उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, अरे तो मोठा नेता आहे. मोठ्या नेत्यांनी छोट्या नेत्याला एकेरीचं बोलायचं असतं. तुला माहिती नाही. आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला 'अहो या बसा पाणी आणून देता का हो? असं नाही. हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळं तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय असं अजित पवार म्हणाले आहेत.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/890001456906995/}}}}
रोहित पवारांनीही घेतला होता समाचार त्या विधानावर पुण्यात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले असताना रोहित पवारांनी पलटवार केला आहे. रोहित पवार म्हणाले, बांगड्या भरल्या असे म्हणणं म्हणजे महिलांचा अपमान आहे. त्यांचा खरा चेहरा हळूहळू समोर येत आहे. ते थोडे घाबरलेले आहेत. त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येईल अशी टीका पवार यांनी त्यांच्यावर केली आहे.
Web Summary : Amidst PMC election rivalry, Mahesh Landge criticized Ajit Pawar, who downplayed it, citing Landge's senior status. Rohit Pawar condemned Landge's remarks as disrespectful to women, revealing his insecurity.
Web Summary : पीएमसी चुनाव प्रतिद्वंद्विता के बीच, महेश लांडगे ने अजित पवार की आलोचना की, जिसे पवार ने लांडगे की वरिष्ठ स्थिति का हवाला देते हुए महत्वहीन बताया। रोहित पवार ने लांडगे की टिप्पणी को महिलाओं के प्रति अपमानजनक बताया, जिससे उनकी असुरक्षा उजागर हुई।