पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत ४१ प्रभागांपैकी ३३ प्रभागांमध्ये खुली जागा एकच आहे. त्यामुळे अनेक दिग्गज माजी नगरसेवक निवडणुकीसाठी एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. त्यात माजी महापौर, उपमहापौर, माजी सभागृहनेते, माजी स्थायी समिती अध्यक्ष यांचाही समावेश आहे. त्यामुळे या लक्षवेधी लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पुणे महापालिकेचे ४१ प्रभाग असून, नगरसेवकांची संख्या १६५ आहे. त्यांपैकी ४० प्रभाग चारसदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज प्रभाग पाचसदस्यीय आहे. त्यामध्ये ३३ प्रभागांमध्ये खुली जागा एकच आहे. त्यात ओबीसी महिला आरक्षण; त्यामुळे अनेकजण राजकीय पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे.
प्रभाग क्रमांक - एकमेकांसमोरील उमेदवाराचे नाव ( पक्ष )
५ योगेश मुळीक ( भाजप ) - संदीप जऱ्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस )५ नारायण गलांडे ( भाजप ) - सचिन भगत (राष्ट्रवादी काँग्रेस )७ रेश्मा भोसले ( भाजप ) - दत्ता बहिरट (राष्ट्रवादी काँग्रेस )९ गणेश कळमकर ( भाजप ) - बाबूराव चांदेरे (राष्ट्रवादी काँग्रेस )१० दिलीप वेडे पाटील ( भाजप ) - शंकर ऊर्फ बंडू केमसे (राष्ट्रवादी काँग्रेस )१४ उमेश गायकवाड ( भाजप ) - बंडू गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस)१६ मारुती तुपे ( भाजप ) - योगेश ससाणे (राष्ट्रवादी काँग्रेस ) - विजय देशमुख (उद्धवसेना. )१८ कालिंदी पुंडे ( भाजप) - रत्नप्रभा जगताप ( काँग्रेस )१८ अभिजित शिवरकर ( भाजप ) - प्रशांत जगताप ( काँग्रेस )१९ हाजी गफूर पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस ) - प्रसाद बाबर ( उद्धवसेना. )२१ श्रीनाथ भिमाले ( भाजप ) - अक्षय जैन ( काँग्रेस )२३ पल्लवी जावळे ( भाजप ) - सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी काँग्रेस )२७ धीरज घाटे ( भाजप ) - अशोक हरणावळ (राष्ट्रवादी काँग्रेस )३६ महेश बावळे ( भाजप ) - आबा बागुल (शिंदेसेना )२४ गणेश बिडकर ( भाजप ) - प्रणव धंगेकर (शिंदेसेना )३१ पृथ्वीराज सुतार ( भाजप ) - किशोर शिंदे (मनसे )३१ दिनेश माथवड ( भाजप )- योगेश मोकाटे (उद्धवसेना )३० सुशील मेंगडे ( भाजप ) - स्वप्निल दुधाणे (राष्ट्रवादी काँग्रेस )३२ सायली वाजंळे ( भाजप ) - दीपाली धुमाळ (राष्ट्रवादी काँग्रेस )३३ किशोर पोकळे ( भाजप ) - काका चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस )३४ हरिदास चरवड ( भाजप ) - नीलेश गिरमे (शिंदेसेना )३८ व्यंकोजी खोपडे ( भाजप ) - प्रकाश कदम (राष्ट्रवादी काँग्रेस ) - वसंत मोरे (उद्धवसेना ) - स्वराज बाबर - (शिंदेसेना )४० वृषाली कामठे ( भाजप )- संगीता ठोसर (शिंदेसेना )४० रंजना टिळेकर ( भाजप ) - रूपेश वसंत मोरे (उद्धवसेना ) - गंगाधर बधे (राष्ट्रवादी काँग्रेस )४१ फारूख इनामदार (राष्ट्रवादी काँग्रेस ) - प्रमोद भानगिरे (शिंदेसेना).
Web Summary : Pune's upcoming PMC election features a four-way battle with many former corporators contesting against each other. Key battles include ex-mayors and committee heads. With limited open seats, political shifts intensify rivalries. BJP, Shinde Sena, NCP, and Congress-Uddhav Sena-MNS create a competitive landscape, making the election noteworthy.
Web Summary : पुणे के आगामी पीएमसी चुनाव में चतुष्कोणीय मुकाबला है, जिसमें कई पूर्व पार्षद एक-दूसरे के खिलाफ चुनाव लड़ रहे हैं। प्रमुख लड़ाइयों में पूर्व महापौर और समिति प्रमुख शामिल हैं। सीमित खुली सीटों के साथ, राजनीतिक बदलाव प्रतिद्वंद्विता को तेज करते हैं। भाजपा, शिंदे सेना, एनसीपी और कांग्रेस-उद्धव सेना-एमएनएस एक प्रतिस्पर्धी परिदृश्य बनाते हैं, जिससे चुनाव महत्वपूर्ण हो जाता है।