शहरं
Join us  
Trending Stories
1
"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु"
2
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
3
हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशला महागात पडणार! IPL 2026 पाठोपाठ आता 'या' खेळातही NO ENTRY?
4
एक्स बॉयफ्रेंड, थर्टी फर्स्टची भेट अन् घरात मिळाला मृतदेह; अमेरिकेत हत्या झालेली निकिता कोण?
5
एकदा फूल चार्ज केल्यानंतर ४० दिवस चार्जरकडं बघायचं नाही? Oppo A6 Pro 5G भारतात लॉन्च!
6
व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या रडारवर कोण? ट्रम्प यांनी ‘या’ देशाचं नाव घेत दिले स्पष्ट संकेत
7
भाग्यवान! पिठाची गिरणी चालवणाऱ्याचं एका क्षणात फळफळलं नशीब, 'असा' झाला करोडपती
8
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, खिडक्यांची तोडफोड, एकाला अटक!
9
काय सांगता! भारतात जे काम फ्री होते, त्यासाठीच अमेरिकेत प्रतितास ९ हजार कमावतात लोक
10
राजस्थानच्या सीकर आणि जालोरमध्ये भीषण अपघात; ६ लोकांचा मृत्यू, १४ जण जखमी
11
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
12
५ लाख थकवले, पैसे मागितले की रडतो...; 'मन हे बावरे'च्या निर्मात्यावर शशांकचे आरोप, मंदार देवस्थळींविरोधात कायदेशीर कारवाई करणार
13
वैभव सूर्यवंशीची कॅप्टन्सीत पहिली फिफ्टी! १० उत्तुंग षटकारांसह २८३ च्या स्ट्राईक रेटनं कुटल्या धावा
14
भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात!
15
BRICS नष्ट करण्याची तयारी; अमेरिकेला का हवे 'या' 5 देशांवर नियंत्रण? जाणून घ्या...
16
आंध्र प्रदेशात ONGC पाइपलाइनमधून गॅसगळतीनंतर भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
17
मीरा भाईंदरमध्ये आठवडा होत आला तरीही उमेदवारांची शपथपत्रेच 'अपलोड' केलेली नाहीत
18
‘५ लाख द्या, नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन’, ड्रायव्हरची मालकिणीला धमकी, त्यानंतर...  
19
नवनीत राणांनी अजित पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर खोडके बरसले; म्हणाले 'औकातीत राहून बोलायला शिका'
20
व्हेनेझुएलावर अचानक हल्ला करून अमेरिकेचा चीन-रशियाला मोठा इशारा; भारतावर काय होणार परिणाम?
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: पुण्यात १६५ जागांसाठी १ हजार १६५ जण रिंगणात; जाणून घ्या, तुमच्या भागातील उमेदवारांची संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 10:45 IST

PMC Election 2026 ४१ प्रभागांमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ९६९ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे

पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि शिंदेसेना यांची युती झालीच नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे पुणे महापालिका निवडणूक चौरंगी होत असल्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. ४१ प्रभागांमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ९६९ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यात प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिकबागमधून भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे १६५ जागासाठी १ हजार १६५ उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात राहिले आहेत.

पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली होती. अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीबाबत निर्णय होऊ शकतो, असे मंत्री उदय सांमत यांनी सांगितले होते; पण आजही युतीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. भाजप आणि शिंदसेनेचे उमेदवार एकमेेकासमोर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेची युती तुटल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. पुणे आणि पिपंरी चिंचवड पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) दोन्हीची आघाडी तर काँग्रेस, उद्धवसेना आणि मनसे एकत्र लढत आहे. त्यामुळे निवडणूक चौरंगी झाली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच सर्व पक्षांच्या नेत्यांची फोनाफोनी सुरू होती. विश्वासू कार्यकर्त्यांमार्फत आश्वासनांची खैरात देऊन उमेदवारी अर्ज मागेे घेण्यास काहींना भाग पाडले. मात्र काहींनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. त्यामुळे उमेदवारासह पक्षनेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिकबागमधून अ जागेवर भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि ब जागेवरून श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे पालिकेने भाजपमध्ये खाते उघडलेले आहे. पालिका निवडणुकीसाठी २ हजार १३४ जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ४१ प्रभागांमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ९६९ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

दोन्ही राष्ट्रवादीमुळे निवडणूक चुरशीची होणार

भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) दोन्हीची आघाडी झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला टक्कर देणार असल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.

प्रभाग क्र. नाव : रिंगणात राहिलेले उमेदवार - माघार घेतलेल्याची संख्या

१ कळस - धानोरी - लोहगाव उर्वरित : ३६- २८२. फुलेनगर - नागपूर चाळ : ४३ - २७३. विमाननगर - लोहगाव : ४३ - २५४. खराडी-वाघोली : २१ - ३५५. कल्याणी नगर-वडगाव शेरी : २७- २७६. येरवडा-गांधीनगर : २१ - ११७ गोखलेनगर-वाकडेवाडी : ३४ - ३२८ औंध-बोपोडी : २५ - १६९ सुस-बाणेर -पाषाण : २८- १४१० बावधन-भुसारी कॉलनी : २२- १४११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर : २५-८१२ छ. शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी : २९- २३१३ पुणे स्टेशन-जय जवान नगर : १५- १२१४ कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा : ३४ - २४१५ मांजरी बुद्रुक-केशवनगर-साडेसातरा नळी : ३३ - १७१६ हडपसर-सातववाडी : ३८ - ५११७ रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी : २९ - २७१८ वानवडी-साळुंके विहार : ४१ - २६१९ कोंढवा खुर्द-कौसर बाग : २२ - १७२० शंकर महाराज मठ-बिबवेवाडी : ४० -३२२१ मुकुंद नगर-सॅलसबरी पार्क : २७ - ५४२२ काशेवाडी-डायस प्लॉट : २०- १५२३ रविवार पेठ-नाना पेठ : ३३ - २८२४ कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल- के. ई. एम हॉस्पिटल : ४०-४४२५ शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई : ३८- २९२६ घोरपडे पेठ-गुरुवार पेठ-समताभूमी : ३३ - २४२७ नवी पेठ-पर्वती : ३९ - ५४२८ जनता वसाहत-हिंगणे खुर्द : २३ - ९२९ डेक्कन जिमखाना-हॅप्पी कॉलनी : ३१-३५३० कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी : ३२ - ११३१ मयूर कॉलनी-कोथरूड : १६- १०३२ वारजे-पॉप्युलर नगर : १९- १९३३ शिवणे-खडकवासला-धायरी पार्ट : २५ -२०३४ नऱ्हे-वडगाव बुद्रुक-धायरी : २२ - २४३५ सनसिटी-माणिक बाग : २० - १४३६ सहकारनगर-पद्मावती : ७ - १३३७ धनकवडी-कात्रज डेअरी : २२- २६३८ बालाजी नगर-आंबेगाव-कात्रज : २७ - ९३९ अप्पर सुपर-इंदिरानगर : ३६- २९४० कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी : २२ - १६४१ महंमदवाडी-उंड्री : २७ - २०

एकूण ११६५ - ९६९

English
हिंदी सारांश
Web Title : Pune PMC Election: 1165 Candidates in Fray for 165 Seats

Web Summary : Pune's PMC election sees a four-way fight as BJP, Shinde Sena, NCP factions, and Congress-led alliance compete for 165 seats. After withdrawals, 1165 candidates remain. BJP already secured two seats unopposed. Nationalist Congress is set to give strong competition.
टॅग्स :PuneपुणेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2026NCPराष्ट्रवादी काँग्रेस