शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्कार सोहळ्याला PM मोदी राहणार उपस्थित; अनेक दिग्गजांचाही सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 8:35 AM

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने आयोजित सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पुणे: शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला असून, या सोहळ्याला पंतप्रधाननरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. या निमित्ताने बाबासाहेबांनी ध्यास घेतलेला ‘शिवसृष्टी’ प्रकल्प करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम व शतकवीर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समितीच्या अध्यक्षा व लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी सांगितले. (pm narendra modi will attend babasaheb purandare felicitation ceremony)

जगदीश कदम आणि सुमित्रा महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पुरंदरे १३ ऑगस्ट २०२१ रोजी तिथीनुसार शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांचा नागरी सत्कार, कोविड मर्यादांचे पालन करीत मोजक्या नामवंतांच्या उपस्थितीत होत आहे. या विशेष कार्यक्रमात पंतप्रधाननरेंद्र मोदी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवसृष्टीला भेट देणार

बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्त आयोजित नागरी सत्कार समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या विशेष कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होत शिवशाहीरांचे अभीष्टचिंतन करणार आहेत. सुमित्रा महाजन, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येईल. सत्कार समारोह समितीचे सदस्य खा. विनय सहस्रबुद्धे या गौरव समारंभात सहभागी असतील. तर, १५ ऑगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवसृष्टीला भेट देणार आहेत, असे जगदीश कदम यांनी सांगितले. 

शिवसृष्टीचे काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प

बाबासाहेबांचा शंभरीनिमित्त सत्कार करीत असताना शिवसृष्टीचे काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे. या संकल्पाला या कार्यक्रमामुळे बळ लाभेल, असा विश्वास सुमित्राताई महाजन यांनी व्यक्त केला. बाबासाहेबांच्या गौरवासाठी गठित करण्यात आलेल्या सत्कार समारोह समितीच्या वतीने पुढील वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. कोरोनातील सर्व नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम होत असल्याने प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश आहे, नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच हा कार्यक्रम @Shivsrushti Puneofficial या अधिकृत फेसबुक पेजवर प्रक्षेपित करण्यात येणार आहे. 

दरम्यान, समारोह समितीत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (तंजावर), भारतरत्न सचिन तेंडुलकर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, विख्यात गायक शंकर महादेवन, ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, प्रमोद चौधरी, उद्योजक प्रतापराव पवार, क्रेडाई- पुणेचे अध्यक्ष अनिल फरांदे यांच्यासह अनेक नामवंतांचा असल्याचे सुमित्रा महाजन यांनी सांगितले. 

टॅग्स :Babasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणे