पंतप्रधान नरेंद्र माेदींसाठी उकडीचे मोदक अन थालपीठ लोणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 08:58 IST2023-08-01T08:56:49+5:302023-08-01T08:58:11+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिली भेट दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला देणार आहेत...

pm modi in pune Pickled Modak and Thalpeeth Butter for Prime Minister Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र माेदींसाठी उकडीचे मोदक अन थालपीठ लोणी

पंतप्रधान नरेंद्र माेदींसाठी उकडीचे मोदक अन थालपीठ लोणी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात त्यांच्या नास्त्यासाठी खास मराठी पदार्थ ठेवण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने उकडीचे मोदक, थालपीठ लोणी, कोथिंबीर वडी आणि मटार करंजी यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिली भेट दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला देणार आहेत. तेथे अभिषेक व आरती झाल्यानंतर त्यांच्या नास्त्याची सोय करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने मोदी यांना खास पुणेरी पदार्थ ठेवावेत, अशी सूचना केली होती. त्यानुसार हे पदार्थ तयार ठेवण्यात येणार आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या शेजारील फरासखाना इमारतीच्या शेजारील हॉल त्यांच्यासाठी खास राखून ठेवण्यात आला आहे. मोजक्या लोकांसमवेत पंतप्रधान या खास मराठी पदार्थांचा आस्वाद घेणार आहेत. सरपोतदार केटरर्सकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Web Title: pm modi in pune Pickled Modak and Thalpeeth Butter for Prime Minister Narendra Modi