शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
4
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
5
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
6
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
7
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
8
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
9
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
10
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
11
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
12
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
13
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
14
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
15
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
16
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
17
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
18
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
19
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
20
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

‘पीएम किसान’चे ठरले, ‘नमो शेतकरी’चा पत्ता नाही..! राज्य सरकारकडून हालचाल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 11:52 IST

राज्यातील ९२ लाख ८८ हजार ८६४ शेतकऱ्यांना १ हजार ९६७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार

पुणे - केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (दि. २४) दिला जाणार आहे. मात्र, गेल्या वेळेप्रमाणे आता राज्य सरकारचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात अजूनही राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. पीएम किसान सन्मान योजनेच्या १९ व्या हप्त्यासाठी राज्यातील ९२ लाख ८८ हजार ८६४ शेतकऱ्यांना १ हजार ९६७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक सुमारे साडेपाच लाख शेतकरी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजनेचा निधी वितरित करून त्याचा राजकीय लाभ उठविण्यासाठी पाच ऑक्टोबर रोजी वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. याचवेळी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा पाचवा हप्तादेखील देण्यात आला. त्यानंतर डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या चार महिन्यांसाठीचा पीएम किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (दि. २४) वितरित हाेणार आहे.बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील मुख्य समारोह सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार असून, राज्यातील ९२ लाख ८८ हजार ८६४ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. यासाठी १ हजार ९६७ कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जाणार आहेत. मात्र, यावेळी राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही हालचाल नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठीच केंद्र व राज्य सरकारच्या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रित वितरित केले होते. मात्र, आता विधानसभा निवडणुका संपल्या असल्याने राज्य सरकारकडून सहाव्या हप्त्याचे नियोजन नसल्याचे या सूत्रांनी सांगितले.

पीएम किसानच्या १९ व्या हप्त्याचे जिल्हानिहाय शेतकरी

जिल्हा - शेतकरी - रक्कम (कोटींत)

अहिल्यानगर - ५,४९,९७३ -११४.६५

अकोला - १,९०,५४७ - ४०.७३

अमरावती - २,७३,७७० - ५७.४४

छत्रपती संभाजीनगर - ३,४५,५८९- ७१.३३

बीड - ३,७८,१३३ - ७९.६८

भंडारा - २,१९,३८१ - ४६.४५

बुलढाणा - ३,४४,५०६ - ७३.५८

चंद्रपूर - २,५०,२९५ - ५३.१५

धुळे - १,५७,२१५ - ३५.०१

गडचिरोली - १,५२,३९७ - ३२.४२

गोंदिया - २,२२,३६१ - ४६.५५

हिंगोली - १,७७,०२२ - ३६.०२

जळगाव - ४,०७,८४२ - ८८.१८

जालना - ३,००,११४ - ६३.९९

कोल्हापूर - ४,८२,८०४ - १०४.८१

लातूर - २,७१,८६४ - ५६.९०

नागपूर - १,८०,४९२ - ३९.९९

नांदेड - ३,८६,००३ - ७९.२७

नंदूरबार - १,०४,७१८ - २२.१९

नाशिक - ४,४१,७३१ - ९२.९५

धाराशिव - २,३७,५२२ - ५०.९६

पालघर - ९९,६७९ - २१.११

परभणी - २,५१,९३१ - ५२.२४

पुणे - ४,४३,६४९ - ९३.०४

रायगड - १,१६,९६० - २५.५९

रत्नागिरी - १,५७,८५८ - ३४.८०

सांगली - ४,००,४४७ - ८३.६४

सातारा - ४,५०,६६० - ९५.४९

सिंधुदुर्ग - १,२२,२६५ - २५.८१

सोलापूर - ५,०३,०९२ - १०७.१५

ठाणे - ७४,९६९ - १६.२२

वर्धा - १,३०,७५१ - २७.४६

वाशिम - १,६७,३२१ - ३६.३०

यवतमाळ - २,९४,००५ - ६१.९८

एकूण - ९२,८८,८६४ - १९६७.०८

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र