शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

पंतप्रधान आवास योजनेचे इमले ‘हवे’तच..? जागा ताब्यात नसताना महापालिकेकडून प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 11:33 AM

खराडी, हडपसर आणि वडगाव खुर्द येथे बांधण्यात येणाऱ्या  ५ हजार ७४० घरांसाठी जागाच अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेली नाही...

ठळक मुद्देनिविदा प्रक्रिया राबविल्या पंतप्रधान आवास योजनेकरिता१ लाख २३ हजार अर्ज प्राप्त जागा ताब्यात मिळविताना पालिकेची दमछाक

पुणे : महापालिकेच्या हद्दीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र, महापालिकेचे हे गरिबांसाठीचे इमले हवेतच उभे राहणार की काय अशी स्थिती आहे. खराडी, हडपसर आणि वडगाव खुर्द येथे बांधण्यात येणाऱ्या  ५ हजार ७४० घरांसाठी जागाच अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेली नाही. असे असतानाही निविदा प्रक्रिया राबवत ठेकेदार निश्चित करण्याची घाई कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खराडी, हडपसर आणि वडगाव खुर्द या ठिकाणांची निवड करण्यात आली असून या कामासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये या खराडी, हडपसर आणि वडगाव खुर्द येथील सहा वेगवेगळ्या जागांवर घरांची योजना राबविण्यासाठी ठेकेदार निवडण्यासंदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निविदांना प्रतिसाद देखील मिळाला. परंतु प्रत्यक्षात जागा ताब्यात आलेली नसतानाच इमारतीचा नकाशा व इतर सर्व प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. मात्र, पुरेशा जागा ताब्यात न आल्याने सध्या अवघ्या ११२६ घरांचेच नियोजन करण्यात आले आहे. खराडी येथील जागेचा न्यायालयामध्ये दावा सुरु असून या जागेच्या मालकांनी तसे लेखी स्वरूपात पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाला कळवले आहे. त्यामुळे ही जागा पूर्णपणे पालिकेच्या ताब्यात आलेली नाही. हडपसर येथील सर्व्हे नं. ७६ (पार्ट) हि जागा देखील अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेली नाही. जागा ताब्यात नसताना या जागांवर परवडणाऱ्या घरांचे इमले कागदावरच उभे राहीलेले आहेत. यापुर्वी राबविण्यात आलेल्या निविदा रद्द करुन नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.  ====पंतप्रधान आवास योजनेकरिता महापालिका प्रशासनाने अर्ज मागविल्यानंतर १ लाख २३ हजार अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी केवळ २० हजार अर्ज पात्र ठरले. प्रशासनाकडून सहा हजार घरांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. काही ठिकाणी पालिकेने जागा ताब्यात नसतानाही निविदा प्रक्रिया राबविली होती. आता त्या जागा ताब्यात मिळविताना पालिकेची दमछाक होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी जागा मालकांचा विरोध होत असल्याचे चित्र आहे. ====

टॅग्स :government schemeसरकारी योजनाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना