शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी लगावला ‘सुवर्ण चौकार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 00:20 IST

खेलो इंडिया २०१९ : वेटलिफ्टिंगमध्ये ३ तर कुस्तीत एका सुवर्णपदकाची कमाई, दुसऱ्या दिवसअखेर १४ पदके

अमोल मचालेपुणे : 'खेलो इंडिया यूथ गेम्स २०१९'मध्ये यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दुसºया दिवशी दमदार कामगिरी करताना सुवर्णपदकांचा चौकार लगावला. आज राज्याच्या खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये ३ तर, कुस्तीत १ सुवर्णपदक आपल्या नावे केले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. वेटलिफ्टिंगमध्ये शुभम कोळेकर, अभिषेक महाजन आणि सौम्या दळवी यांनी आपापल्या गटात महाराष्ट्राला सुवर्णपदके जिंकून दिली. २१ वर्षांखालील मुलांच्या ५५ किलो वजन गटामध्ये शुभमने २३६ किलो वजन उचलत अव्वल स्थान पटकावले. ओडिशाच्या मुन्ना नायक याने (२३० किलो) रौप्यपदक जिंकले. २२५ किलो वजन उचलणारा महाराष्ट्राचा प्रशांत कोळी कांस्यपदकांचा मानकरी ठरला.

१७ वर्षांखालील मुलींच्या ४० किलो वजन गटात सौम्या दळवीने सुवर्णयश मिळविले. तिने १११ किलो वजन उचलताना आपलीच सहकारी आरती टी. हिला मागे टाकले. १०० किलो वजन उचलणाºया आरतीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. १७ वर्षांखालील मुलांच्या ५५ किलो वजन गटामध्ये अभिषेकने २११ किलो वजन उचलून अव्वल स्थान प्राप्त केले. छत्तीसगडच्या सुभाष एल. याने २०५ किलो वजनासह रौप्यपदक प्राप्त केले. कुस्तीत बुधवारी यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बुधवारी एकूण ५ पदकांची कमाई केली. कोल्हापूरचा मल्ल प्रवीण पाटील याने धडाकेबाज कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. त्याने १७ वर्षांखालील मुलांच्या ५५ किलोखालील वजन गटात अटीतटीच्या अंतिम फेरीत त्याने हरियाणाचा मल्ल ललितवर १०-९ने सरशी साधली.१७ वर्षांखालील मुलांच्या ९२ किलो वजन गटात महाराष्ट्राचा पृथ्वीराज खडके रौप्यपदकाचा मानकरी ठरला. दिल्लीच्या नवीन पुनियाविरुद्धची त्याची लढत एकतर्फी ठरली. यात नवीनने पृथ्वीराजचा १२-०ने धुव्वा उडविला.अमृत रेडकर आणि कुंदन या राज्याच्या खेळाडूंनी आपापल्या गटांत कांस्यपदक प्राप्त केले. अमृत हा १७ वर्षांखालील मुलांच्या ६५ किलो वजनगटात तेजवीरकडून ४-८ने पराभूत झाला. २१ वर्षांखालील मुलांच्या ६७ किलो वजनगटात झालेल्या उपांत्य लढतीत मलकित हुडा याने कुंदनवर ६-०ने एकतर्फी विजय मिळवला.ज्ञानेश्वर देसाईचे सुवर्ण हुकले१७ वर्षांखालील मुलांच्या ५१ किलो वजन गटात महाराष्ट्राच्या ज्ञानेश्वर देसाई याचे सुवर्ण थोडक्यात हुकले. अतिशय रंगतदार ठरलेल्या अंतिम लढतीत त्याला मणिपूरच्या के. एल. सिंगकडून ३-४ अशा निसटत्या फरकाने पराभव पत्करावा लागला. या निर्णायक लढतीत ज्ञानेश्वरने प्रतिस्पध्यार्ला चांगलेच झुंजवले. मात्र निर्णायक क्षणी के. एल. सिंग याने सरस खेळ करीत सुवर्ण आपल्या नावे केले अन् ज्ञानेश्वरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.स्पर्धेचे उद्घाटन राजवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सरसंचालिका नीलम कपूर, खेलो इंडियाचे सीईओ संदीप प्रधान, चेअरमन राजेंद्र सिंग, नाडाचे सरसंचालक नवीन अगरवाल, राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, महापौर मुक्ता टिळक यांसह स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडू, क्रीडा विभागाचे सर्व अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी उपस्थित होते.दुसºया दिवशी १२ पदकांची कमाईखेलो इंडिया स्पर्धेच्या पहिल्या सत्रात महाराष्ट्राचे अव्वल स्थान थोडक्यात हुकले होते. यंदा ती कसर भरून काढण्याच्या इराद्याने या संघाचे खेळाडू स्पर्धेत उतरले आहेत. दुसºया दिवशी यजमान संघाच्या खेळाडूंनी ४ सुवर्णांसह १२ पदक जिंकत प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा दिला.महाराष्ट्राच्या वेटलिफ्टिंमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आज लक्षणीय कामगिरी करताना ३ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य अशा भरीव कामगिरीसह ५ पदके जिंकली. कुस्तीतही राज्याच्या मल्लांनी ठसा उमटवताना १ सुवर्ण आणि प्रत्येकी २ रौप्य आणि २ कांस्यपदकांसह ५ पदके जिंकत बुधवारच्या खेळावर छाप पाडली. दुसºया दिवसअखेर महाराष्ट्राने ४ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्यपदकांसह एकूण १४ पदके जिंकली आहेत. 

टॅग्स :Puneपुणे