खेळाडूंमध्ये देशाचे भविष्य घडविण्याची क्षमता; १३ व्या राज्य वुशू स्पर्धेला शानदार झाली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 20:36 IST2026-02-21T20:20:20+5:302026-02-21T20:36:51+5:30

Pune : पुण्यातील येरवाडा विभागीय क्रीडा संकुल सभागृहात आयोजित १३ व्या राज्य सब ज्युनियर आणि ज्युनियर वुशु स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात दीप प्रज्वलन प्रसंगी उपस्थित मान्यवर.

Players have the ability to shape the future of the country; 13th State Wushu Championship gets off to a great start | खेळाडूंमध्ये देशाचे भविष्य घडविण्याची क्षमता; १३ व्या राज्य वुशू स्पर्धेला शानदार झाली सुरुवात

Players have the ability to shape the future of the country; 13th State Wushu Championship gets off to a great start

किशोर बागडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे :
खेळाडूंनी आयुष्यात नेहमी शिस्त बाळगायला हवी. वेळेचे व्यवस्थापन करीत अथक परिश्रमाच्या जोरावर ते देशाचे भविष्य घडविण्याची क्षमता बाळगतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक नीलेश कानडे यांनी शनिवारी पुण्यात सुरू झालेल्या १३ व्या राज्य सब ज्युनियर आणि ज्युनियर गट दोन दिवसीय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

येरवाडा येथील विभागीय क्रीडा संकुल सभागृहात महाराष्ट्र ॲमॅच्युअर वुशू संघटनेच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील २५० खेळाडूंनी भाग घेतला. कानडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाद्वारे स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचे सचिव श्रीकांत पंडित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पुणे विभागाचे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, कराटे ग्रॅन्डमास्टर सी. के. सिंग, आरएसएसचे विदर्भ प्रांत प्रचारक वैभव भगत, उद्योजक कुमार कोकील, अभिनेते स्वप्निल राऊत आदींची उपस्थिती होती. श्रीकांत पंडित यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना आई-वडिलांचे संस्कार जोपासण्याचे, मोबाइल तसेच व्यसनापासून दूर राहण्याचे आणि खेळात शंभर टक्के प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र ॲमॅच्युअर वुशू संघटनेचे अध्यक्ष कुमार मसराम, चेअरमन माधव चितळे आणि महासचिव सुभाष उरकुडे यांनी सर्व पाहुण्यांचे स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्पर्धेचा तपशील माधव चितळे यांनी मांडला. सूत्रसंचालन प्रा. रेखा राऊत यांनी केले, तर सुभाष उरकुडे यांनी आभार मानले. स्पर्धेचा समारोप आणि पुरस्कार वितरण आज, रविवारी सायंकाळी होणार आहे. स्पर्धा आयोजनासाठी डॉ. श्रीराम आगलावे, राजू शेंदरे, करण असवारे आदी परिश्रम घेत आहेत.
 

Web Title : वुशू स्पर्धा शुरू, खिलाड़ियों में देश का भविष्य संवारने की क्षमता उजागर।

Web Summary : पुणे में राज्य स्तरीय सब जूनियर वुशू प्रतियोगिता शुरू हुई। उद्यमी नीलेश कानडे ने एथलीटों के अनुशासन और राष्ट्र निर्माण की क्षमता पर जोर दिया। महाराष्ट्र एमेच्योर वुशू एसोसिएशन द्वारा आयोजित इस कार्यक्रम में 250 प्रतिभागी शामिल हैं। गणमान्य व्यक्तियों ने सफलता के लिए मूल्यों, फोकस और विकर्षणों से बचने पर जोर दिया।

Web Title : Wushu event begins, highlighting athletes' potential to shape nation's future.

Web Summary : The state-level Sub Junior Wushu competition commenced in Pune. Entrepreneur Nilesh Kanade emphasized athletes' discipline and potential to build the nation. The event, organized by the Maharashtra Amateur Wushu Association, features 250 participants. Dignitaries stressed values, focus, and avoiding distractions for success.

टॅग्स :Puneपुणे