शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

Video : बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन; आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 11:16 AM

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देजवळपास एक तास ठिय्या; घोषणाबाजी करत ढोल वाजवत आंदोलन

बारामती : आरक्षण तत्काळ लागू करा नाहीतर खुर्च्या खाली करा, अशी  घोषणाबाजी करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी या बारामती येथील निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या ‘वतीने ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.मराठा समाजाच्या आरक्षणाला मिळालेल्या स्थागतीच्या विरोधात बारामतीमध्ये ‘ढोल बजाओ आंदोलन’ करण्यात आले. सकाळी आठ वाजता भिगवण रोड वरील पी एन जी चौकातून मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र आले.होते.यावेळी सोशल डिस्टन्स,मास्क,सॅनिटायजर चा वापर करण्यात आला.

आंदोलकांनी भगवा झेंडा घेऊन व एक मराठा लाख मराठा लिहिलेली टोपी घालून आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. चौकातून आंदोलक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीकडे घोषणाबाजी करत रांगेत जाताना ‘एक मराठा लाख मराठा,आरक्षण टिकवा नाहीतर मराठा समाजाच्या खासदार,आमदार,मंत्र्यांनी राजीनामा द्या, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे..कोण म्हणतं देत नाय, घेतल्या शिवाय राहत नाय’....अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव एकत्र आले होते.आंदोलकांनी हातात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश व नोकरीत निवड निश्चित करा तसेच कायद्यात टिकणारे आरक्षण द्या असे बॅनर हातात घेतले होते.आंदोलकांनी सहयोग सोसायटीच्या समोर पवार यांच्या निवास्थानासमोर घोषणाबाजी करत ढोलवाजवत आंदोलन केले. जवळपास एक तास आंदोलक येथे ठिय्या मांडून बसले होते.यावेळी सोशल डिस्टन्सचा वापर करण्यात आला.आंदोलनाच्या ठिकाणी रस्त्यावरमोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होते.

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन