विकेंडला ट्रेकिंगचा प्लॅन करताय ! तर पुण्याजवळील 'या' किल्ल्याचा नक्की विचार करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 20:04 IST2020-01-02T20:04:02+5:302020-01-02T20:04:41+5:30
हिवाळ्यात ट्रेकिंगचा विचार करत असल्यास पुण्याजवळील अनेक ठिकाणांना तरुण भेटी देऊ शकतात.

विकेंडला ट्रेकिंगचा प्लॅन करताय ! तर पुण्याजवळील 'या' किल्ल्याचा नक्की विचार करा
पुणे : थंडी सुरु झाली असल्यामुळे तरुणांकडून विकेंडला ट्रेकिंगचे प्लॅन्स आखले जातात. परंतु ट्रेकिंगला कुठे जायचे याबाबत नेहमीच तरुणांना प्रश्न पडताे. या विकेंडला तुम्ही ट्रेकींगचा प्लॅन करत असाल आणि पुण्याजवळच्या ठिकाणाच्या शाेधात असाल तर तिकाेणा किल्ल्याचा तुम्ही नक्कीच विचार करु शकता.
पुण्यापासून 60 किलाेमीटर अंतरावर तिकाेणा किल्ला आहे. त्रिकाेणी आकारवरुन या किल्ल्याला तिकाेणा असे नाव पडले आहे. 3500 फूट इतकी या किल्ल्याची उंची आहे. तुम्ही पुण्यापासून चारचाकी किंवा दुचाकीवरुन किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊ शकता. किल्ला चढण्यासाठी तुम्हाला एक ते दाेन तास लागू शकतात. किल्ल्यावरुन तुम्हाला संपूर्ण पवना धरण दृष्टीस पडते. मावळ प्रांतावर देखरेखीसाठी या किल्ल्याची निर्मीती करण्यात आली हाेती. किल्ल्यावर अनेक गुहा आहेत. तसेच तळजाई देवीचे मंदिर देखील याठिकाणी आहे.
तिकाेणा किल्ल्यावर ट्रेकिंग करताना ही काळजी घ्या
- किल्ला चढताना ग्रिप असलेल्या शुजचा वापर करा. शक्यताे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट परीधान करावे.
- साेबत पाण्याची बाटली आणि फस्ट एड किट बाळगा.
- माहिती असलेल्या तसेच किल्लावर दर्शविलेल्या वाटेवरुनच किल्ल्यावर चढाई करा. अन्यथा वाट चुकण्याची शक्यता असते.
- अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेक असताे, त्यामुळे माहीत असलेल्या वाटेनेच जा
- साेबत प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा खाण्यास काही नेले असल्यास त्याची वेष्टण बॅगेत भरुन परत घेऊन या. गडावर कुठेही कचरा करु नका.