शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

पाण्याचा नियोजनबद्ध वापर हवा ; पाणी पुरवठ्यावरुन अनेकदा राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 21:16 IST

भविष्यात पाणी टंचाईचे संकट टाळायचे असेल तर पाण्याचा नियोजनबद्ध वापर करायला हवा..

ठळक मुद्देपरिसंवादात सूर : ‘पुण्याचे पाणी : सत्य आणि मिथक’ बाबत चर्चा

पुणे : शहरालगत असलेला धरणातील पाणीसाठा वाढत्या पुण्याला पाणी पुरवण्यासाठी अपुरा पडतो. परिणामी, पाणी पुरवठ्यावरुन अनेकदा राजकारण होते. पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. भविष्यात पाणी टंचाईचे संकट टाळायचे असेल तर, प्रशासनासह आपण सर्व पुणेकर नागरिकांनी पाण्याचा नियोजनबद्ध वापर करायला हवा, असा सूर 'पुण्याचे पाणी : सत्य आणि मिथक' या विषयावरील परिसंवादात उमटला.मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे स्थानिक केंद्र यांच्य संयुक्त विद्यमाने व इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन पुणेच्या सहभागाने या परिसंवादाचे आयोजन केले होते. जंगली महाराज रस्त्यावरील दि इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनीअर्सच्या काळे सभागृहात झालेल्या या परिसंवादात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव विद्यानंद रानडे, वैज्ञानिक डॉ. व्ही. एम. प्रभाकर, डॉ. मंगेश कश्यप, डॉ. अशोक मोरे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ या मान्यवरांनी सहभाग घेतला होता. परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.कुलकर्णी म्हणाले, शहराची वाढ झपाट्याने होत असून आजूबाजूची गावे शहरात समाविष्ट होत आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी वाढू लागली आहे. १९९३ नंतर राज्यात कोणतेही नवीन धरण बांधण्यात आले नाही. परंतु, लोकसंख्या वाढ मात्र प्रचंड होत आहे. २०५१ मधील लोकसंख्येची गरज सध्याच्या लोकसंख्येच्या २.६ पट असेल. अर्थातच पाण्याची मागणी त्याच पटीने वाढेल व त्यासाठी आतापासून नियोजनाची गरज आहे. पाण्याचे मीटर व टेलीस्कोपिक दर लावणे अत्यंत गरजेचे आहे. प्रभागात मीटर बसवल्यावर पाण्याची गळती शोधून कमी करता आली. पाण्याचा योग्य वापर व फेर वापर करनेअत्यंत गरजेचे आहे. रानडे म्हणाले, पूर्वीच्या काळात शेतीसाठी पाणी आरक्षित ठेवले जात होते. परंतु, आता परिस्थिती उलट झाली असून, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्यासाठी झगडावे लागते आहे. शहरांतील दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा विचार केला पाहिजे. महापालिकेकडून पाण्याचे मोजमाप होणे गरजेचे आहे आणि पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.भुजबळ म्हणाले, पाण्याचा पुनर्वापर करण्याचा खर्च सद्यस्थितीत जास्त आहे. येणाºया काळात तंत्रज्ञान विकसित होईल. तेव्हा ती गोष्ट सोपी होईल. भूजल कायदा अधिक कडक करण्याची आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्याचा उपयोग पाण्याची पातळी वाढण्यासाठी होईल. पुण्यात राजकीय इच्छाशक्ती व लोकसहभागाने हे शक्य होऊ शकते.’कश्यप म्हणाले, पाणी वापराच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. यात महिलांचा सहभाग वाढवायला हवा. कुठल्याही राजकीय दबाव न येता पाण्याचे नियमन करणे गरजेचे आहे. डॉ. प्रभाकर म्हणाले, की नदीच्या पाण्याची गुणवत्ता मोजणे व ती लोकपर्यंत पोहोचवणे शक्य आहे. सांडपाण्याचा उपयोग पाण्याप्रमाणे संसाधन म्हणून वापराण्यासाठी संशोधन गरजेचे आहे.डॉ. अशोक मोरे म्हणाले, कॉलेजमध्ये पाणी विषयावर अभ्यास व संशोधन केले जाते. ते अधिक व्हायाला हवा. समापन करताना राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, की पाणी प्रश्नांकडे एकात्मिक दृष्टीने बघायला हवे. शासनाइतकाच नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. पुण्या शहराची लोकसंख्या उपलब्ध पाण्यानुसार ठरवायला हवी. वसंत शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर नंदू भोई यांनी आभार मानले. या प्रसंगी  डॉ. निलिमा राजुरकर, डॉ. सुजाता बरगाले, संजय मा. क.  विलास रबडे, के. एन. पाटे. डॉ. दिनकर मोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका