विमान उड्डाणाला 11 तास विलंब झाल्यानं प्रवाशांची कंपनीविरोधात घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 10:11 IST2019-04-29T09:45:25+5:302019-04-29T10:11:03+5:30

पुणे विमानतळावरून दुबईकडे रविवारी रात्री ८ वाजता उड्डाण करण्याची नियोजित वेळ असलेल्या विमानाला तब्बल ११ तास विलंब झाला आहे.

The plane's flight was delayed by 11 hours due to the hoaxes of the passengers against the company | विमान उड्डाणाला 11 तास विलंब झाल्यानं प्रवाशांची कंपनीविरोधात घोषणाबाजी

विमान उड्डाणाला 11 तास विलंब झाल्यानं प्रवाशांची कंपनीविरोधात घोषणाबाजी

पुणे - पुणे विमानतळावरून दुबईकडे रविवारी रात्री ८ वाजता उड्डाण करण्याची नियोजित वेळ असलेल्या विमानाला तब्बल ११ तास विलंब झाला आहे. हे विमान सकाळी ७ वाजता दुबईकडे रवाना झाले. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. हे विमान स्पाइस जेट कंपनीचे होते. प्रवाशानी कंपनीविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर विमानतळावरच घोषणाबाजी करून ढिसाळ नियोजनाचा निषेध केला. दुबई येथून हेच विमान पुन्हा पुण्यात येणार आहे. या विमानाची नियोजित वेळ रविवारी रात्री 11.30 होती. मात्र पुण्यातून जाणारे विमान उशिरा पोहोचल्याने आता दुबईतून हे विमान दुपारी दीड वाजता म्हणजे तब्बल 14 तास विलंबाने पोहोचेल. कंपनीकडून तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितले जात आहे.

Web Title: The plane's flight was delayed by 11 hours due to the hoaxes of the passengers against the company

टॅग्स :Puneपुणे