शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक बॉक्सची तपासणी भारतातच सुरू; हेलिकॉप्टर अपघात रोखण्यासाठी कडक उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:39 IST

विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सची तपासणी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोमार्फत (एआयबी) तपासणी सुरू असून, ती परदेशात पाठवण्याची गरज भासलेली नाही, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू दिली.

पुणे :अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, संबंधित ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेने मागितले होते; परंतु विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सची तपासणी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोमार्फत (एआयबी) तपासणी सुरू असून, ती परदेशात पाठवण्याची गरज भासलेली नाही, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू मंगळवारी दिली.पुण्यात ७ वी हेलिकाॅप्टर आणि लघु विमान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी राममोहन नायडू यांनी संवाद साधला. यावेळी केंद्रीय हवाई नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. राममोहन नायडू म्हणाले की, विमान अपघाताची कारणे तपासणीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याच्या चर्चा काही माध्यमांतून झाल्या होत्या. मात्र, त्या अफवा असून, प्रत्यक्षात देशातच तपास सुरू आहे. ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या वेग, उंची, इंजिन बिघाड व इतर माहितीचे रेकाॅर्ड असते.अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियांच्या एअर बस या विमानाने उड्डाण घेतल्यावर काही सेंकदातच अपघात घडला होता. त्या घटनेनंतर ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर लगेच तपासणी कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. शिवाय ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्या केवळ अफवा आहेत.हेलिकॉप्टर अपघातांची पुनरावृत्ती टाळणारचारधाम यात्रेदरम्यान गेल्या आठवड्यात हेलिकॉप्टरचा अपघात होऊन सहा पर्यटकांचा मृत्यू झाला होता. चारधाम यात्रेत भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. दरम्यान हवामानात अचानक बदल झाल्यावर हेलिकॉप्टर अपघाताची शक्यता अधिक असते, यासाठी हवामान निरीक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून माहिती संकलन केले जाणार आहे. केदारनाथ व बद्रीनाथमध्ये सुरक्षित हेलिकॉप्टर सेवा पुरवण्यात सरकार कटिबद्ध आहे. देशात हेलिकॉप्टर अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये, प्रवासात पर्यटकांच्या सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात येत असून, डोंगराळ भागात एअर ट्रॅफिक कंट्रोलचे व्यवस्थापनही करण्यात येणार आहे, असेही नायडू यांनी सांगितले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAccidentअपघातAir Indiaएअर इंडिया