शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली; नऊ जण जखमी; ४० घरांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 12:50 IST

अग्निशामक दल आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले..

ठळक मुद्देजखमींना ससून व भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी करण्यात आले दाखल

गौरव कदम पुणे : पर्वतीजवळील जनता वसाहतीत शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता पाण्याची तब्बल १८ इंची पाईपलाईन फुटून पूर आला. यामध्ये ३० ते ४० घरांमध्ये पाणी घुसून येथील रहिवासी पन्नास ते साठ फूट वाहत गेले. त्यामुळे नऊ जण जखमी झाले आहेत.

जनता वसाहत गल्ली क्रमांक २९ मध्ये हा भीषण प्रकार घडला. ही वसाहत डोंगरउतारावर वसलेली आहे. या भागातून पुण्याला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइॅन गेलेली आहे.  पर्वतीच्या  टेकडीवरून येणारे पाणी असल्याने त्याला खूप प्रेशर होते. त्यामुळे अनेकांना गंभीर जखमा झाल्या आहेत.महेश  मोरे, रविंद्र  कोंढाळकर,  सुनीता बाईत, पीयूष जाधव , अक्षय सोलकर हे यामध्ये जखमी झाले आहेत. त्यानां ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.इतर जखमींना भारती विद्यापीठ हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या पर्वतीवर बांधण्यात आल्या आहेत. त्याला पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून सप्लाय होतो.  त्या टाक्या अगोदर भरल्या जातात आणि त्यातून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो. डोंगरावरून पाणी येत असल्याने पाण्याला प्रेशर येते. या प्रेशरने पाणी उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दोघा जणांचे हाडा मध्ये फ्रॅक्चर झाले आहे अशी माहिती जनता वसाहत मधील सामाजिक कार्यकर्ते सूरज लोखंडे यांनी दिली

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जनता वसाहतीमध्ये अनेक गल्या आहेत. या गल्यांमध्ये प्रेशरने पाणी घुसल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान गल्ली नंबर २९ मधील घरांचे झाले. या घरांमध्ये इतक्या वेगाने पाणी घुसले की घरातील अनेक जण पाण्याबरोबर वाहत गेले. आदळले गेल्यामुळे त्यांना जखमा झाल्या आहेत.सूर्यकांत लोंढे यांचे घर या पाण्यामुळे पडले.सुरूवातीला पाणी हळू येत होते. नंतर त्याचा वेग  वाढला. रात्रीची वेळ असल्याने लोकांना काही समजले नाही. लोक घराच्या बाहेर आल्यावर त्यातील अनेक जण घसरून पाण्याबरोबर वाहत गेली. त्यांना वाचविण्यासाठी गेलेले काहीजणही जखमी झाले.

टॅग्स :Sahakar NagarसहकारनगरAccidentअपघातWaterपाणीFire Brigadeअग्निशमन दलPoliceपोलिस