शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पिंपरी-चिंचवडकर ठरवतात मावळचा खासदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 12:45 AM

पिंपरी व चिंचवड येथील सर्वाधिक लोकसंख्या असलेले मतदार भावी खासदार ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

- हणमंत पाटीलपिंपरी - गतपंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत घाटाखालील पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांत शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना मताधिक्य होते. तरीही घाटाच्या वर असलेल्या पिंपरी, चिंचवड व मावळ या विधानसभा मतदारसंघांत अधिकचे मताधिक्य मिळाल्याने शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी दीड लाखाच्या फरकाने बाजी मारली. त्यामुळे पिंपरी व चिंचवड येथील सर्वाधिक लोकसंख्या असलेले मतदार भावी खासदार ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ व २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर व श्रीरंग बारणे विजयी झाले. काँग्रेस आघाडीत मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असूनही पक्षाच्या उमेदवाराला गटबाजी व बंडखोरीचा फटका बसला आहे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करीत शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी स्वीकारली. त्यामुळे पंचाईत झालेल्या राष्ट्रवादीला ऐनवेळी राहुल नार्वेकर यांना उमेदवारीसाठी आयात करावे लागले. गतपंचवार्षिक निवडणुकीवेळी देशभर मोदी यांची लाट होती. त्याचा फायदाही भाजपा व शिवसेना युतीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना झाला. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे ५ ला

ख १२ हजार असे मतदान त्यांना मिळाले. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पिंपरी, चिंचवड, मावळ व कर्जत या चार विधानसभा मतदारसंघांत त्यांनी प्रतिस्पर्धी लक्ष्मण जगताप व राहुल नार्वेकर यांच्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. लक्ष्मण जगताप यांना शेकापचा प्रभाव असलेल्या पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी मिळाली. तरी आमदार असतानाही स्वत:च्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात तब्बल ६४ हजार मतांनी पीछेहाट झाली. तसेच, राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्याचाही फटकाही जगताप यांना पिंपरी-चिंचवडसह कर्जत मतदारसंघात बसल्याने त्यांना एकूण ३ लाख ५४ हजार मतांवर समाधान मानावे लागले.दरम्यान, राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या पिंपरी-चिंचवडसह सर्वच मतदारसंघांत पक्षाचे आयात उमेदवार राहुल नार्वेकर यांचीही पीछेहाट झाली. त्यामुळे नार्वेकर यांना १ लाख ८२ हजार अशी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यानंतर ‘आप’चे उमेदवार मारुती भापकर यांना ३० हजार आणि टेक्सास गायकवाड यांना २६ हजार मते मिळाली होती.

 

टॅग्स :mavalमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक