पिंपरी-चिंचवडकर ठरवतात मावळचा खासदार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 00:45 IST2019-03-23T00:45:10+5:302019-03-23T00:45:42+5:30
पिंपरी व चिंचवड येथील सर्वाधिक लोकसंख्या असलेले मतदार भावी खासदार ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

पिंपरी-चिंचवडकर ठरवतात मावळचा खासदार!
- हणमंत पाटील
पिंपरी - गतपंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत घाटाखालील पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांत शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना मताधिक्य होते. तरीही घाटाच्या वर असलेल्या पिंपरी, चिंचवड व मावळ या विधानसभा मतदारसंघांत अधिकचे मताधिक्य मिळाल्याने शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी दीड लाखाच्या फरकाने बाजी मारली. त्यामुळे पिंपरी व चिंचवड येथील सर्वाधिक लोकसंख्या असलेले मतदार भावी खासदार ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ व २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर व श्रीरंग बारणे विजयी झाले. काँग्रेस आघाडीत मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असूनही पक्षाच्या उमेदवाराला गटबाजी व बंडखोरीचा फटका बसला आहे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करीत शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी स्वीकारली. त्यामुळे पंचाईत झालेल्या राष्ट्रवादीला ऐनवेळी राहुल नार्वेकर यांना उमेदवारीसाठी आयात करावे लागले. गतपंचवार्षिक निवडणुकीवेळी देशभर मोदी यांची लाट होती. त्याचा फायदाही भाजपा व शिवसेना युतीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना झाला. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे ५ ला
दरम्यान, राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या पिंपरी-चिंचवडसह सर्वच मतदारसंघांत पक्षाचे आयात उमेदवार राहुल नार्वेकर यांचीही पीछेहाट झाली. त्यामुळे नार्वेकर यांना १ लाख ८२ हजार अशी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यानंतर ‘आप’चे उमेदवार मारुती भापकर यांना ३० हजार आणि टेक्सास गायकवाड यांना २६ हजार मते मिळाली होती.