पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एका तासात चारचाकीसह पळविला ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 13:02 IST2021-03-29T13:01:39+5:302021-03-29T13:02:11+5:30

दोन्ही वाहनांचे लॉक तोडून केला पळवण्याचा पराक्रम

Pimpri-Chinchwad: A truck with four-wheelers was hijacked in an hour | पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एका तासात चारचाकीसह पळविला ट्रक

पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एका तासात चारचाकीसह पळविला ट्रक

ठळक मुद्देवाहनांची किंमत साडेतीन लाख

पिंपरी : शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. अज्ञात चोरट्यांनी चारचाकी सह एक ट्रक चोरून नेला. कासारवाडी आणि थेरगाव येथे शनिवारी वाहन चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. 

खाजा नबी शेख (वय ५०, रा. कासारवाडी) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांच्या वेल्डिंग शॉप जवळ शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांचे एक लाख २० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन पार्क केले होते. अज्ञात चोरट्यांनी चारचाकी चोरून नेले . शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

युनूस रशीद खान पठाण (वय ४४, रा. थेरगाव) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांचा दोन लाख रुपये किमतीचा सहाचाकी ट्रक रस्त्याच्या कडेला लॉक करून पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी तो ट्रक चोरून नेला. वाहन चोरीचा हा प्रकार रविवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला. 

Web Title: Pimpri-Chinchwad: A truck with four-wheelers was hijacked in an hour