पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ, वाहनचोरीचे सत्र अजूनही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 13:55 IST2021-04-15T13:54:59+5:302021-04-15T13:55:30+5:30

ट्रकसह पळवली दुचाकी

Pimpri-Chinchwad thieves are rampant, vehicle theft season is still going on | पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ, वाहनचोरीचे सत्र अजूनही सुरूच

पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ, वाहनचोरीचे सत्र अजूनही सुरूच

ठळक मुद्देवाकड आणि चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी: वाहनांची चोरी करून त्याचे स्क्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. त्यानंतरही वाहन चोरीचे प्रकार सुरूच आहेत. वाहन चोरट्यांनी एका ट्रकसह दुचाकी चोरून नेली आहे. याप्रकरणी वाकड आणि चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन रामचंद्र देवकाते (वय ३४, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवकाते यांचा तीन लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रक मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास काळेवाडी फाटा येथे पुलाखाली लॉक करून पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी तो ट्रक चोरून नेला. वाहन चोरीचा हा प्रकार बुधवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला.

प्रसाद वामन वैद्य (वय ३६, रा. चिंचवड) यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
वैद्य यांनी १० हजार रुपये किमतीची दुचाकी तानाजी नगर येथील सुमती प्रकाश आपार्टमेंट येथे ७ एप्रिल २०२१ रोजी पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार ८ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आला.

Web Title: Pimpri-Chinchwad thieves are rampant, vehicle theft season is still going on