Pimpri-Chinchwad: Theft of two-wheelers is the highest in the country | पिंपरीत वाहन चोरींच्या घटनांनी नागरिक हैराण, दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक

पिंपरीत वाहन चोरींच्या घटनांनी नागरिक हैराण, दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक

ठळक मुद्देनागरिकांना कुठेही वाहन पार्क करणे झाले अवघड

पिंपरी: पिंपरीत अजूनही वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. त्यामध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक असून नागरिक आता या चोरीच्या घटनांनी हैराण झाले आहेत. वाहन चोरट्यांनी शहरातून दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. भोसरी आणि निगडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

अश्विन निवृत्ती निकम (वय २८, रा. कासारवाडी,) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे. निकम यांची ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी भोसरी येथील पुलाखाली समाधान हॉटेल समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार १५ ते २० एप्रिल दरम्यान घडला.

विजयकुमार हरीरीम कुंभार (वय ३५, रा. आकुर्डी गावठाण) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे. त्यांची १६ हजार रुपये किंमतीची दुचाकी त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क करून ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरी सहा प्रकार ३१ मार्च ते १ एप्रिल २०२१ दरम्यान घडला.

पिंपरीत वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. नागरिकांना कुठेही वाहन पार्क करणे अवघड झाले आहे. संचारबंदी आणि कडक निर्बंध असूनही वाहन चोरीचे प्रकार घडत आहेत. नागरिक कोरोनाच्या परिस्थितीत फक्त कामासाठी बाहेर पडतात. वाहन पार्किंगच्या जागेत तासभर वाहने पार्क करतात. पण तेवढ्या वेळातही संधी साधून वाहन चोरले जात आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pimpri-Chinchwad: Theft of two-wheelers is the highest in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.