शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:54 IST

राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतरच किती हरकती व सूचना स्वीकारल्या आहेत

पिंपरी : आगामी निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या ३१८ हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना तयार केली. ही अंतिम रचना महापालिकेने राज्य शासनाकडे सादर केली. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतरच किती हरकती व सूचना स्वीकारल्या आहेत, हे स्पष्ट होईल, असे महापालिका आयुक्त, निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.महापालिकेने २२ ऑगस्टला चार सदस्यीय पद्धतीने ३२ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली होती. या प्रभाग रचनेवर ३१८ हरकती आल्या होत्या. त्यामध्ये माेरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर या प्रभागांच्या रचनेवर सर्वाधिक म्हणजे ११५, त्या खालोखाल प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाण, माेरे वस्ती या प्रभागाबाबत ९८ आणि महेशनगर, संत तुकारामनगर व वल्लभनगर प्रभागाबाबत ३१ हरकती आल्या होत्या. ३१८ हरकतींवर राज्याचे सहकार आणि विपणन विभागाचे प्रधान प्रवीण दराडे यांनी १० सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली. एकाच दिवशी सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली होती.

हरकतींबाबत माहिती देण्यास टाळाटाळ...हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रभाग रचना अंतिम केली. १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान महापालिका आयुक्तांमार्फत नगरविकास विभागाला प्रभाग रचना सादर करावी लागणार होती. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केली. मात्र, हरकती किती स्वीकारल्या याची माहिती नाही. आयोगाने मान्यता दिल्यानंतरच किती हरकती स्वीकारल्या हे कळेल, असे सांगत प्रशासनाने हरकतींची माहिती देण्यास टाळाटाळ केली.ऑक्टोबरमध्ये अंतिम प्रभाग रचना

महापालिकेने सादर केलेली अंतिम प्रभाग रचना राज्य शासन २२ सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला देईल. आयोगाच्या मान्यतेनंतर ३ ते ६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाला सादर केली आहे. किती हरकती स्वीकारल्या, याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून रचनेला मान्यता मिळाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.  - शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2024