पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:54 IST2025-09-19T13:53:53+5:302025-09-19T13:54:22+5:30

राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतरच किती हरकती व सूचना स्वीकारल्या आहेत

Pimpri Chinchwad the final ward structure of Pimpri-Chinchwad Municipal Corporation is with the state government. | पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाकडे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाकडे 

पिंपरी : आगामी निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या ३१८ हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना तयार केली. ही अंतिम रचना महापालिकेने राज्य शासनाकडे सादर केली. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतरच किती हरकती व सूचना स्वीकारल्या आहेत, हे स्पष्ट होईल, असे महापालिका आयुक्त, निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

महापालिकेने २२ ऑगस्टला चार सदस्यीय पद्धतीने ३२ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली होती. या प्रभाग रचनेवर ३१८ हरकती आल्या होत्या. त्यामध्ये माेरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर या प्रभागांच्या रचनेवर सर्वाधिक म्हणजे ११५, त्या खालोखाल प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाण, माेरे वस्ती या प्रभागाबाबत ९८ आणि महेशनगर, संत तुकारामनगर व वल्लभनगर प्रभागाबाबत ३१ हरकती आल्या होत्या. ३१८ हरकतींवर राज्याचे सहकार आणि विपणन विभागाचे प्रधान प्रवीण दराडे यांनी १० सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली. एकाच दिवशी सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली होती.

हरकतींबाबत माहिती देण्यास टाळाटाळ...

हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रभाग रचना अंतिम केली. १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान महापालिका आयुक्तांमार्फत नगरविकास विभागाला प्रभाग रचना सादर करावी लागणार होती. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केली. मात्र, हरकती किती स्वीकारल्या याची माहिती नाही. आयोगाने मान्यता दिल्यानंतरच किती हरकती स्वीकारल्या हे कळेल, असे सांगत प्रशासनाने हरकतींची माहिती देण्यास टाळाटाळ केली.

ऑक्टोबरमध्ये अंतिम प्रभाग रचना

महापालिकेने सादर केलेली अंतिम प्रभाग रचना राज्य शासन २२ सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला देईल. आयोगाच्या मान्यतेनंतर ३ ते ६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाला सादर केली आहे. किती हरकती स्वीकारल्या, याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून रचनेला मान्यता मिळाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.  - शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

 

Web Title: Pimpri Chinchwad the final ward structure of Pimpri-Chinchwad Municipal Corporation is with the state government.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.