शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बुलेटच्या धडकी भरवणाऱ्या सायलन्सर पोलिसांनी फिरवला बुलडोजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 20:23 IST

- वाहनांच्या सायलन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्या चालकांवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

पिंपरी : शहरात बुलेट दुचाकीच्या सायलन्सर मध्ये बदल करुन मोठा आवाज करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. सुमारे ३९१ दुचाकीवर कारवाई करत सायलन्सर वर बुलडोजर फिरवला असून दंड वसूल केला आहे. ही कारवाई वाहतूक पोलिसांनी केली आहे.वाहनांच्या सायलन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्या चालकांवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. २०२५ मध्ये अशा प्रकारच्या १४,५९२ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच जानेवारी २०२६ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १,५४३ प्रकरणांमध्ये कारवाई करून १८ लाख ४३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.दरम्यान, २४ फेब्रुवारी २०२६ ते २६ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांत वाहतूक शाखेअंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध वाहतूक विभागांकडून बुलेट सायलन्सरमध्ये फेरफार केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ३६८ बुलेट सायलन्सर जप्त करण्यात आले. यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या सायलन्सरसह एकूण ३९१ सायलन्सर निकामी करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

बुलेट सायलन्सरमधील फेरफारामुळे ध्वनीप्रदूषणात वाढ होत असून नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागतो. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी ही कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावर्कर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. वाहतूक विभागातील प्रभारी अधिकारी व अंमलदार यांच्या पथकांनी शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाई केली.  नागरिकांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करता वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहील, असा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Police Crush Illegal Bullet Silencers, Fine Violators

Web Summary : Pimpri police cracked down on modified Bullet silencers, causing noise pollution. They crushed 391 silencers, collecting ₹1.44 crore in fines in 2025 and ₹18.43 lakh in early 2026. The action, led by Vivek Patil, aims to curb disturbances to residents.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी