Pimpri Chinchwad : मळवंडी ठुले धरणात पाय घसरून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 20:35 IST2025-10-30T20:35:10+5:302025-10-30T20:35:37+5:30
यावेळी इतर दोघांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Pimpri Chinchwad : मळवंडी ठुले धरणात पाय घसरून एकाचा मृत्यू
पवनानगर - मळवंडी ठुले धरण परिसरातील तिकोणा गावाच्या हद्दीत काल (दि. २९ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एकाचा पाय घसरून मृत्यू झाला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, तिकोणा गावच्या हद्दीतील एका बंगल्यावर गवंडी काम करणारे वडील, मुलगा आणि आणखी एक मजूर सायंकाळी काम आटोपून मळवंडी ठुले धरणावर हातपाय धुण्यासाठी गेले होते.
त्यावेळी सोहम अनिल पवार (वय १५ वर्षे, रा. उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे) हा धरणात उतरला होता. मात्र, त्याचा पाय घसरल्याने तो धरणातील गाळात गेला. यावेळी इतर दोघांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेत सोहम अनिल पवार (वय १५ वर्षे, रा. उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला असून, पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ चपटे, प्रशांत तुरे आणि भिमा वांळुज हे करत आहेत.