कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे

By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 17:52 IST2025-06-15T17:46:28+5:302025-06-15T17:52:31+5:30

मावळ ( पिंपरी चिंचवड):  मावळ तालुक्यात आज एक मोठी दुर्घटना घडली असून, कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची ...

pimpari-chinchwad The old bridge over the Indrayani river collapsed in Maval Kundamala Bridge Collapses Search operations hampered by riot | कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे

कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे

मावळ ( पिंपरी चिंचवड): मावळ तालुक्यात आज एक मोठी दुर्घटना घडली असून, कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, २५ ते ३० पर्यटक नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी तळेगाव पोलीस,पिंपरी चिंचवड अग्निशामक दल, पी एम आर डी ए अग्निशामक दल, लष्कराचे  एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

तसेच अपघातातील जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका ही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात घालवण्यात आले आहे. मात्र कुंड मळा येथे नैसर्गिक रांजणखळगे आहे. नदीच्या प्रवाहामध्ये रांजणखळले असल्याने पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानंतर त्या ठिकाणी जखमी किंवा मृतांचा शोध घेणे अवघड असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पूलाचा भाग बाहेर काढण्यासाठी प्रयत्न

मावळ परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दुर्घटना झाल्यानंतर घटनास्थळी मावळचे आमदार सुनील शेळके पोचले आहे. घटनास्थळी क्रेन पाचारण केले आहे. पाण्यात कोसळलेला पुलाचा लोखंडी भाग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.'

सांगाड्याखाली लोक अडकण्याची शक्यता

ज्यावेळेस पुल कोसळला त्यावेळी पुन्हा वर शंभर ते दीडशे पर्यटक उभे होते. तसेच पुलाखालील भागामध्ये ही काहीजण नदीकाठी बसले होते. अचानक फुल कोसळल्याने त्याखाली अनेक जण दबले गेले आहेत.  त्यांचा अशी शक्यता प्रत्यक्षदर्शनी वर्तविली आहे.  

पुल अत्यंत जुना झालेला; प्रशासनाचे दुर्लक्ष

इंद्रायणी नदीवरील कुंडामाळा येथील पूल अत्यंत जुना झाला आहे या संदर्भातील फलक या ठिकाणी लावला होता. या पुलाची दुरुस्ती ही अनेक वेळा केली आहे.  तरीही त्या ठिकाणाहून वाहने नेण्यात येत होती. तसेच या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती.

Web Title: pimpari-chinchwad The old bridge over the Indrayani river collapsed in Maval Kundamala Bridge Collapses Search operations hampered by riot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.