शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘पिफ’चे आज होणार उद्घाटन; रसिकांची होणार ‘दमछाक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 01:00 IST

सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख राहणार उपस्थित

ठळक मुद्देदिग्दर्शक बी. पी. सिंग व अभिनेते विक्रम गोखले यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अ‍ॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार‘महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष’ अशी या वर्षीच्या महोत्सवाची ‘थीम’

पुणे : देशविदेशातील विविध चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास उद्या (९ जानेवारी) पासून मोठ्या दिमाखात सुरूवात होत आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता ‘पिफ’चा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.‘पिफ’च्या उद्घाटन सोहळ्यात ‘सीआयडी’ सारख्या हिंदी मालिकांचे दिग्दर्शक बी. पी. सिंग आणि अभिनेते विक्रम गोखले यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अ‍ॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीच्या ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अ‍ँड साउंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबरोबरच सीआयडी या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्याबरोबर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे व अभिनेता सुबोध भावे यांची खास उपस्थिती असणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.‘महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष’ अशी या वर्षीच्या महोत्सवाची ‘थीम’ असून, या कार्यक्रमानंतर जुआन होजे कँपानेला दिग्दर्शित ‘द विझल्स टेल’ हा अर्जेंटीनाचा चित्रपट महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून लॉ कॉलेज रस्ता व कोथरूड येथील एनएफएआयमध्ये दाखविला जाईल. उद्या (९ जानेवारी) पासून दि. १६ जानेवारीपर्यंत देशविदेशातील तब्बल १९१ चित्रपट पाहाण्याची संधी रसिकांना मिळणार आहे..................रसिकांची होणार ‘दमछाक’दरवर्षी ‘पिफ’चा उद्घाटन सोहळा ज्या ठिकाणी आयोजित केला जातो. तिथेच ‘ओपनिंग फिल्म’ दाखवली जाते. मात्र यंदा उद्घाटन सोहळा ‘बालगंधर्व’ ला आणि चित्रपटाचे स्क्रिनिंग ‘एनएफ आय विधी महाविद्यालय रस्ता आणि कोथरूड’ला होणार असल्याने रसिकांची चांगलीच दमछाक होणार आहे. चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक व्यक्ती उद्घाटन सोहळ्याला कितपत फिरकतील हा प्रश्नच आहे.

टॅग्स :PuneपुणेPIFFपीफJabbar Patelजब्बार पटेल cinemaसिनेमाVikram Gokhaleविक्रम गोखले