"माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये" असे म्हणत केला विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 17:18 IST2021-07-07T17:18:51+5:302021-07-07T17:18:58+5:30

मंचरच्या पिंपळगाव खडकी येथील घटना; पतीविरोधात गुन्हा दाखल

Physical and mental torture of a married woman in manchar | "माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये" असे म्हणत केला विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

"माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये" असे म्हणत केला विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

ठळक मुद्देलग्न झाल्यानंतर पतीकडून पत्नीला वारंवार उपाशी ठेवत, तुझे बाहेर संबंध असल्याचा संशय घेऊन लाथाबुक्क्यांनी वारंवार मारहाण

मंचर: मंचरच्या पिंपळगाव खडकी येथील विवाहितेला ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ केला आहे. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मोनिका अनिकांत बांगर ( वय ३२ रा.थोरांदळे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता मोनिका हिचा विवाह २०१९ ला पिंपळगाव खडकी येथील अनीकांत विठ्ठल बांगर यांच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर पती बांगर यांनी पत्नीला वारंवार उपाशी ठेवून, तुझे बाहेर संबंध आहेत. असा संशय घेऊन लाथाबुक्क्यांनी वारंवार मारहाण केली.

वेळोवेळी उपाशी ठेवण्यात आले. तसेच ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणत त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला आहे. याबाबत मोनिका बांगर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तिचा पती अनिकांत विठ्ठल बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित मडके करत आहे.

Web Title: Physical and mental torture of a married woman in manchar