शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सासवडजवळ अपघातात फलटणचे क्रीडा अधिकारी गजानन पाटील यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 20:11 IST

पाटील हे राष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक प्रशिक्षक आणि बालेवाडी येथेही क्रीडा मार्गदर्शक म्हणून करत होते काम

सासवड  :पालखी महामार्गावर सासवडजवळ ट्रक आणि कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात फलटण तालुका क्रीडा अधिकारी व राष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक प्रशिक्षक गजानन पाटील ( वय ५५ वर्षे ) यांचे निधन झाले आहे. सासवड - जेजुरी रस्त्यावर सासवड हद्दीत कऱ्हा नदीच्या पुलापलीकडे हॉटेल जगदंबसमोर बुधवारी ( दि १८ ) सकाळी ११ . ४५ च्या सुमारास हा अपघात घडला.     याबाबत या अपघातातील ट्रकचालक मोरेश्वर नारायण शिंदे ( वय ५२ वर्षे ) रा. मोरगाव, ता बारामती यांनी सासवड पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. सासवड पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ( दि १८ ) सकाळी ११ . ४५ च्या सुमारास जेजुरीकडून पुण्याकडे जाणारा ट्रक ( एमएच. १२. आरएन. ३२१० ) याला विरुद्ध बाजूने व ओव्हरटेक करताना मारुती स्विफ्ट कार ( एमएच.१२. एनजे. ५७३० ) ने धडक दिली. या अपघातात कारमधील गजानन पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना सासवड येथील एक खासगी रुग्णालयात नेण्यात आले. दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरु असतांना पाटील यांचा मृत्यू झाला.     गजानन पाटील हे मूळचे सांगलीतील असून सध्या ते पुण्यातील जांभूळवाडी येथे राहत होते. फलटण येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून ते काम करीत होते. ते राष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक प्रशिक्षक असून पुण्यातील बालेवाडी येथेही क्रीडा मार्गदर्शक म्हणून काम करीत होते. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू