पुणे - सोलापूर महामार्गावर पेट्रोलच्या टँकरने घेतला पेट; चालकामुळे मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 05:03 PM2021-10-05T17:03:01+5:302021-10-05T17:03:28+5:30

क्लीनरला भाजले असून टँकरच्या केबीनचे मोठे नुकसान झाले आहे. 

Petrol tanker on Pune-Solapur highway The driver avoided a major accident | पुणे - सोलापूर महामार्गावर पेट्रोलच्या टँकरने घेतला पेट; चालकामुळे मोठी दुर्घटना टळली

पुणे - सोलापूर महामार्गावर पेट्रोलच्या टँकरने घेतला पेट; चालकामुळे मोठी दुर्घटना टळली

Next
ठळक मुद्देबघ्यांनी मोठी गर्दी केल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प

लोणी काळभोर : पुणे - सोलापूर महामार्गावर ज्वलनशील पदार्थ वाहतूक करणा-या टँकरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने टँकरने पेट घेतला. चालकाने समयसुचकता दाखवून तो महामार्गावरून बाजूला घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. यामध्ये क्लीनरला भाजले असून टँकरच्या केबीनचे मोठे नुकसान झाले आहे. 

टँकर चालक विष्णू आंबेकर ( वय २८, रा. कदमवाकवस्ती ) हे पुण्यातील लडकत सर्व्हिस स्टेशनवरून लोणी काळभोरला हिंदुस्थान पेट्रोलियम टर्मिनलकडे निघाले होते. ते कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका येथे पोहोचले. त्यावेळी त्यांना वायर जळाल्याचा वास आला. परंतु गॅरेज तेथून जवळच इंडियन ऑइल टर्मिनल शेजारी असल्याने टॅकर महामार्गावर न थांबवता दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ते गॅरेजपाशी पोहोचले व टॅकर समोरच्या मोकळ्या जागेत उभा केला. 

गॅरेजजवळ टँकरच्या केबीनमधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. अचानक त्याठिकाणी आग लागली. मोठा जाळ होताच आंबेकर व क्लीनर तुळशीराम कवटे हे खाली उतरले. उतरताना कवटे यांचे डाव्या हाताला भाजले. त्याला उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नजीक असलेल्या हिंदूस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचा अग्नीशमन बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचला. काही वेळाने पुणे महानगरपालिकेचा बंबही तेथे पोहोचला.

परंतु तत्पूर्वी हिंदूस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या सुरक्षा अधिकारी महेक चंगराणी व त्यांचे पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले होते. याठिकाणी हिंदूस्तान पेट्रोलियमचे डेप्यूटी जनरल मॅनेजर राजेंद्र वाघमारे हे स्वत: उपस्थित होते. सदर टँकर मोकळा असला तरी जर तो पुणे - सोलापूर महामार्गावर थांबवला असता तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप धावाधाव करावी लागली असती. व त्यामुळे इतर गाड्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. सदर बर्निंग टँकरचा थरार पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Web Title: Petrol tanker on Pune-Solapur highway The driver avoided a major accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.