पुण्यातही पेट्रोलचे शतक. पॅावर पेट्रोल शंभरीपार तर साधे पेट्रोल ९६.६२ रुपये लिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 09:20 AM2021-02-20T09:20:11+5:302021-02-20T09:25:08+5:30

पुण्यात पेट्रोलची शंभरी पॅावर आणि स्पीड पेट्रोल १००.३ रुपये लिटर साघे पेट्रोल ९६.६२ रुपये लिटर तर डिझेल ८६.३६

Petrol prices reach Rs.100 per litre in Pune. Power petrol to cost 100.3 rupees per litre | पुण्यातही पेट्रोलचे शतक. पॅावर पेट्रोल शंभरीपार तर साधे पेट्रोल ९६.६२ रुपये लिटर

पुण्यातही पेट्रोलचे शतक. पॅावर पेट्रोल शंभरीपार तर साधे पेट्रोल ९६.६२ रुपये लिटर

Next

पुणेकरांनो तुम्ही जर पॅावर किंवा स्पीड पेट्रोल भरत असाल तर आता तुम्हांला लिटर मागे शंभर रुपये मोजावे लागणार आहे.पुण्यानेही आता पेट्रोलच्या पेट्रोलची शंभरी गाठली आहे.  इंधनांच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्यानंतर पुण्यात पेट्रलने शतक गाठले आहे. 

गेल्या काही दिवसांपासूनच पेट्रोल डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहे. सरकार फक्त टॅक्स किंवा या किॅमती कमी करण्यासाठी काही करता येतंय का याची चाचपणी सुरु असल्याचे सांगत आहे. पण कोणत्ताही दिलासा मिळण्याची सध्या चिन्ह दिसत नाहीयेत.  आता पुण्यातही पेट्रोलने शंभरी पार केलेली आहे. 

आजच्या किंमती नुसार साधे पेट्रोल ९६.६२ रुपये  तर पॅावर पेट्रोल १००.३ रुपये लिटर झाले आहे. तर डिझेल साठीही लिटर मागे ८६.३६  रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान अनेक पेट्रोल पंपावर १०० रुपयांच्या कॅलिब्रेशनची सोय नसल्याने अडचणी येत होत्या. त्यामुळे आज किती पेट्रोल पंप सुरळीत सुरु राहतात ते पहावे लागेल. 

Web Title: Petrol prices reach Rs.100 per litre in Pune. Power petrol to cost 100.3 rupees per litre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.