शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवण्यास परवानगी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 15:52 IST

इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मार्च, एप्रिल च्या कोट्यातील साखर व्यापाऱ्यांनी उचलली नाही....

बारामती: आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर नेहमी अस्थिर आहेत. मागणी आणि पुरवठ्याच्या गणितावर साखरेचे दर ठरतात. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘ज्युस टू इथेनॉल’ला केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे साखर कारखाने साखरेऐवजी ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती करतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी बोलताना दिली. 

बारामती येथे शनिवारी (दि. ५) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पवार माध्यमांशी बोलत होते. इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मार्च, एप्रिल च्या कोट्यातील साखर व्यापाऱ्यांनी उचलली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साखर लॅप झाली आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या गणितावर साखरेचे दर ठरतात. परंतू आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता ब्राझीलमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला फायदा होणार आहे. साखरेच्या निर्यातीचे दर देखील बरे आहेत. साखरेची पोती कारखान्याकडे गोडावूनमध्ये राहिली तर वर्षाला ३६५ रूपये व्याज प्रत्येक पोत्यासाठी कारखान्याला भरावे लागत आहे.  या व्याजातच कारखाने अडचणीत येतात. त्यामुळे शेतकऱ्याला पाहिजे तसा दर देता येत नाही. त्यामुळे २० टक्के इथेनॉल मिसळण्यास दिलेली परवानगी योग्य आहे. इथेनॉल खरेदी केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसात तेल कंपन्या त्याचे पैसे देतात. मात्र, तयार होणारे इथेनॉल तातडीने उचलले जात नाही. महाराष्ट्रातील काही कारखाने परराज्यात जाऊन तेथील तेल कंपन्यांना इथेनॉल देत आहेत. त्याचा आर्थिक भुर्दंड कारखान्यांना उचलावा लागत आहे अशी पुष्टी पवार यांनी जोडली. -----------------------------

खासगीमध्ये १ हजार रूपयांना कोरोना लस... आज सकाळी सिरम इन्स्टिट्यूटच्या डॉ. जाधव यांच्याशी कोरोना लसी संदर्भात चर्चा झाली. खासगी केंद्राला ६०० रूपये दराने लस देण्यात येत आहे. उत्पादित लसींपैकी ५० टक्के लसी केंद्र सरकारला तर ५० टक्के लस इतर राज्य व खासगी केंद्रांना देण्यात येत आहे. मुंबई आणि पुणे येथे खासगी लसीकरण केंद्र सरू आहेत. ते १ हजार रूपयांना लस देत आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यामांशी बोलताना दिली. पवार पुढे म्हणाले, १८ ते ४४ साठी राज्य सरकारने कोविशिल्ड लसीसाठी ३०० रूपये प्रतिडोस तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनसाठी ४०० रूपये प्रतिडोस ठरवण्यात आले होते. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. पवार साहेबांनी डॉ. जाधव यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे जाधव यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच केंद्राने परदेशातील लसींना देखील परवानगी दिली आहे. --------------------आषाढी वारीसंदर्भात लवकरच सर्वसमावेशक तोडगा...वारी संदर्भात वारकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. काल यासंदर्भात बैठक झाली आहे. या बैठकीत वारकऱ्यांचे प्रतिनिधी व प्रशासन यांना मान्य होईल असा तोडगा निघाला नाही. विभागिय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली याबाबत एक समिती नेमली आहे. त्यामुळे या समिती व वारकरी प्रतिनिधींच्या चर्चेतून सर्वसमावेशक तोडगा निघेल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांवेळी म्हणाले. --------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवारCentral Governmentकेंद्र सरकार