शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Election Results 2026: पिंपरीत भाजपची सत्ता! राष्ट्रवादीचे ७६, शरद पवार पक्षाचे ५, शिंदेसेनेचे २ तर अपक्ष ३ दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:52 IST

PCMC Election Results 2026 भाजपचे ३३, राष्ट्रवादी (शरद पवार)चे ५, अपक्ष ३, शिंदेसेनेचे २ आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत

पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत २०२६ मध्ये अनेक प्रभागांत अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी राष्ट्रवादी (अजित पवार)च्या तब्बल ७६ उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. याशिवाय भाजपचे ३३, राष्ट्रवादी (शरद पवार)चे ५, अपक्ष ३, शिंदेसेनेचे २ आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

या निवडणुकीतील लढती किती अटीतटीच्या होत्या, याचे चित्र या मतसंख्येतून दिसून येते. राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांना २० हजारांहून अधिक मते मिळाली आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक २ ब मधील अश्विनी जाधव यांना २० हजार ५२६, तर प्रभाग २ ड मधील वसंत बोराटे यांना २१ हजार ४९३ मते मिळाली. मात्र, तरीही दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला.

याशिवाय १५ ते २० हजारांपर्यंत मते मिळविणारे पाच उमेदवार आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या प्रभाग १ ब मधील साधना काशीद, प्रभाग २ अ मधील रुपाली आल्हाट, प्रभाग २ क मधील विशाल आहेर, तसेच भाजपचे प्रभाग १ अ मधील सुरेश म्हेत्रे आणि प्रभाग १ क मधील शीतल यादव यांचा समावेश आहे.

१० ते १५ हजार मते मिळवणारे ५७ उमेदवार

१० ते १५ हजार मते मिळविणाऱ्या उमेदवारांची संख्या ५७ इतकी असून, त्यात राष्ट्रवादीचे ३१, भाजपचे १९, राष्ट्रवादी (शरद पवार)चे २, अपक्ष १ आणि शिंदेसेनेचा एक उमेदवार आहे. तसेच १० हजारांच्या आतील मते मिळविणाऱ्या उमेदवारांची संख्या ६० असून, यामध्ये सर्वाधिक ३७ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. भाजपचे १४, राष्ट्रवादीचे (शरद पवार) ३, मनसे व अपक्ष प्रत्येकी दोन, तर शिंदेसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार यामध्ये समाविष्ट आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PCMC Election 2026: BJP wins, NCP second with 76 candidates.

Web Summary : In the PCMC 2026 elections, BJP won, but NCP (Ajit Pawar) secured second place with 76 candidates. NCP (Sharad Pawar) had 5, Shinde Sena 2, and independents 3 in second position. Close contests were evident, with some NCP candidates exceeding 20,000 votes despite losing.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण