शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

भरपूर पैसे द्या, ॲडमिशन घ्या! पालकांना लाखाे रुपयांचा गंडा, वेळीच सावध हाेण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 10:46 IST

पालकही मुलाला सीट मिळेल या आशेने या एजंटांकडे पैसे ओततात....

पुणे : आपल्या पाल्याला चांगल्या महाविद्यालयात आणि आवडीच्या शाखेत प्रवेश मिळावा म्हणून पालक वाटेल ते करायला तयार असतात. याचाच फायदा घेत एजंटगिरी बाेकाळली असून ‘मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाची सीट मिळत नाही? तर काळजी करू नका; आम्हांला फक्त काही हजार ते लाख रुपये द्या आणि तुम्हाला ‘ओळखी’तून सीट मिळवून देताे’ असे सांगत पालकांना भुरळ घालत अक्षरश: लूट सुरू आहे.

पालकही मुलाला सीट मिळेल या आशेने या एजंटांकडे पैसे ओततात. मात्र, पाल्याला सीट मिळाली नाही तर हेच पैसे बहुतेक पालकांना परत मिळतच नाहीत. पालकही ते मागत नसल्याने एजंट गब्बर हाेत आहेत.

सध्या मेडिकल व इंजिनिअरिंगला जास्त मागणी आहे. पुण्यातील बहुुतांश शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच नावाजलेल्या संस्थांमध्ये ॲडमिशन मिळावे ही पालकांची आणि विद्यार्थ्यांचीही इच्छा असते. ज्यांना मार्क कमी आहेत किंवा जे पुण्याबाहेर राहणारे आहेत आणि प्रवेश घेण्याच्या शर्यतीत आहेत, अशांना हे एजंट हेरतात आणि संपर्क करतात.

एजंटांची समांतर व्यवस्था

पुण्यात नुकताच असाच एक प्रकार घडला आहे. यामध्ये पालकाकडून ५० हजार घेतले आणि सीट मिळालीच नाही. तरीही एजंटाने पालकाला पैसे परत दिले नाहीत. अलीकडे शिक्षण क्षेत्रात शिक्षण सम्राट तयार झाल्याने त्यांची फी दांडगी असते. पैसे ओतणारेदेखील कमी नाहीत. याचाच फायदा घेण्यासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या उद्देशाने पैसे घेऊन प्रवेश देण्याची एजंटांची एक समांतर व्यवस्था तयार झाली आहे.

अशी असते ‘माेडस’

- पुण्यात यायचे. एक आलिशान ऑफिस थाटायचे आणि काॅल करण्यासाठी मुलींना ठेवायचे. त्यामधून जे गळाला लागतात त्यांना ऑफिसला किंवा आलिशान हाॅटेलमध्ये बाेलवून मार्केटिंग करून पटवून द्यायचे. अशी सर्वसाधारणपणे यांची माेडस असते.

- ओळखीतूनदेखील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून मॅनेजमेंटने ठरवलेल्या एकूण सीटच्या दहा टक्के रक्कम (जी ५० हजार ते २ लाख रुपये असते) भरायला सांगतात. नंतर प्रवेश झाला तर ठीक परंतु प्रवेश न मिळाल्यास घेतलेली रक्कम परत देण्यास टाळाटाळ करतात. यामध्ये बहुतेक करून बिहार, झारखंडच्या एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे.

यादी कशी मिळते? :

जेव्हा दरवर्षी मेडिकल, इंजिनीयरिंग प्रवेशप्रक्रिया सुरू हाेते तेव्हा सर्व विद्यार्थ्यांचा डेटा जसे त्यांचे नाव, पत्ता, माेबाइल नंबर हे सीईटी सेल, नीट यांच्याकडे असताे. ताे लीक व्हायला नकाे. मात्र, तरीही हा डेटा एजंटांना बिनबाेभाट मिळताे. यावरून कुठेतरी शासकीय यंत्रणादेखील पैसे घेऊन डेटा लीक करत या घाेटाळ्याला मदत करते असे दिसून येते.

विद्यार्थीही करतात एजंटगिरी :

जे विद्यार्थी अशा एजंटांच्या माध्यमातून आलेले असतात ते देखील पुढे अशी एजंटगिरी करायला सुरुवात करतात. त्यांनी त्यांच्या ओळखीचे काही ‘बकरे’ आणल्यानंतर या एजंटांकडून कमिशन मिळत असल्याने ते देखील एजंटगिरी सुरू करतात. त्यांचा म्हाेरक्या त्यांना माेठमाेठ्या हाॅटेलमध्ये घेउन जाऊन दारू-जेवण देत ‘खूष’ करताे. त्यापाेटी हे मुले आपला इमान गहाण ठेवून बिनधास्तपणे एजंटगिरी सुरू करतात. तर, त्याच्यावर विश्वास ठेवून इतर मुलेही यात अडकतात.

पालकांनी अशा एजंटांपासून सावध राहायला हवे. एका विद्यार्थ्याला तर एमबीबीएसला ॲडमिशन देण्याचे आमिष दाखवून ६५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यामध्ये पाेलिसांकडे तक्रार केली, तरी त्याचा फारसा उपयाेग हाेत नाही. पालकही तक्रार द्यायला तयार हाेत नाही. अशा प्रकारे हे एजंट दीड महिन्यांत काेट्यवधी रुपये कमावतात.

- अक्षय जैन, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेस

असा आला अनुभव...

आम्हाला फाेन आला हाेता. माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी नाेटबुक एज्युकेशन या एजन्सीने पुण्यातील नामांकित काॅलेजमध्ये इलेक्ट्राॅनिक ॲण्ड टेलिकम्युनिकेशन विषयाला ॲडमिशन करून देण्यासाठी साडेतीन लाख रुपये मागितले. त्यानुसार आधी पन्नास हजार रुपये संबंधिताच्या खात्यात ऑनलाइन पाठवले. त्यानंतर त्यांना फाेन केल्यास पुन्हा-पुन्हा फाेन करू नका, पैसे परत देताे, असे सांगायचे. २० नाेव्हेंबर ही ॲडमिशनची शेवटची तारीख हाेती. त्यानंतर इतर काॅलेजचा पर्याय दिला; पण तेथे सुरक्षित वाटत नव्हते हे सांगितल्यास ‘बाकी लाेगाें की बच्चीया नहीं रहती क्या’ असे बाेलून खिल्ली उडवली. शेवटी ॲडमिशन झालेच नाही. नंतर त्यांनी फाेन उचलणेच बंद केले. आता पैसे द्यायला टाळाटाळ करत आहेत. याचा फार मानसिक त्रास हाेत आहे.

- पृथ्वीराज पाटील, पालक, जळगाव

टॅग्स :PuneपुणेMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयfraudधोकेबाजी