शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

पेव्हिंग ड्रायव्हिंग ठरतेय डोकेदुखी : फुटपाथवरुन चालणे झाले अवघड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 13:57 IST

नागरिकांना चालण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा येवू नये याकरिता प्रशस्त फुटपाथ तयार करण्यात आले आहेत. परंतु...

ठळक मुद्देबेशिस्त वाहनचालकांची मुजोरगिरी फुटपाथवर बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग  केल्यामुळे कधी कधी चालण्यासाठी जागा मिळत नाहीपेव्हर ड्रायव्हींग या नियमानुसार २०० रुपये  दंड आणि पार्किंग केल्यास १००० रू. दंडवाहन चालकांच्या बेकायदेशीर ड्रायव्हिंगमुळे अपघाताचा धोका वाढला

पुणे :  वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत बिनधास्तपणे फुटपाथवरुन वाहने हाकणा-यांमुळे नागरिकांची डोकेदुखी सातत्याने वाढत आहे. यामुळे फुटपाथ चालण्याकरिता आहेत की गाडी चालविण्यांकरिता असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. विशेष म्हणजे अशा पेव्हिंग ड्रायव्हिंग करणा-यांची मुजोरगिरीवर वाहतूक पोलीस प्रशासन मात्र कारवाई करत नसल्याचे दिसून आले आहे.  स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील विविध भागात रस्ता बांधणी, फुटपाथ निर्मिती, त्यावर आकर्षक सजावट करण्यात आली. नागरिकांना चालण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा येवू नये याकरिता प्रशस्त फुटपाथ तयार करण्यात आले आहेत. परंतु त्या फुटपाथवरुनच वाहनचालक वाहने चालवत असल्याने नागरिकांना चालणे अवघड होवून बसले आहे. शहरात जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता यावर वाहनचालक उद्दामपणे फुटपाथवरुन वाहने चालवत असल्याचे दिसून आले आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या या फुटपाथवर अनेकांनी आपली खाद्यपदार्थांची दुकाने थाटल्याने फुटपाथाची जागा आणखी कमी केली आहे. यामुळे अगोदरच वाहतूक कोंडीच्या प्रश्नाने हैराण केलेल्या पुणेकरांना फुटपाथवरुन देखील चालण्यास वाहनचालकांच्या अरेरावीला सामोरे जावे लागत आहे.  उपनगरांमध्ये देखील याप्रकारचे चित्र पाहवयास मिळत आहे. विशेषत: सायंकाळी कोरेगाव पार्कमध्ये वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहनचालक फुटपाथवरुन बिनधास्तपणे वाहन चालवत आहेत. अशावेळी त्या फुटपाथवरुन चालणा-या नागरिकांना वाहतूक कोंडी बरोबरच वाहनचालकांच्या बेशिस्तपणाला तोंड द्यावे लागत आहे. ....................* पदपथाची दुरावस्था झाली पदपथावर होणा-या बेकायदेशीर पार्किंगमुळे आणि पदपथावरून जाणा-या गाड्यांमुळे खूप वेळ थांबावे लागते. यामुळे महाविद्यालयात वेळेत पोहचण्यास अनेकदा उशीर होतो. वाहनचालकांसोबत वाद होतात,पदपथावरून  बेकायदेशीर चालवल्या जाणा-या गाड्यांमुळे पदपथाची दुरवस्था झाली आहे. - तृप्ती फावडे, विद्यार्थिनी, गरवारे महाविद्यालय* फुटपाथवर बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग  केल्यामुळे कधी कधी चालण्यासाठी जागा मिळत नाही. तेव्हा  रस्त्यावरून चालावे लागते.  अशावेळी अपघात होण्याची भीती वाटते. सायकल पार्किंगकरिता जागा मिळत नाही. - समाधान बोराडे * मुख्यत: एफ.सी.रस्त्याला अनुसरून फुटपाथची आकार वाढला आहे. तसेच रहदारी वाढल्याने पायी चालणा-यांना त्रासाला सामोरे जावे लागते.  साधारणत: १०% वाहने फुटपाथवरून जातात. याचा सामान्य नागरिक व विद्यार्थी यांना मुख्यत: जास्त सामना करावा लागतो.त्यामुळे अधिक चिडचिडेपणा वाढतो. - कोमल कोळपे विद्याथीर्नी, मॉडर्न महाविद्यालय * सायकल चालवत असताना स्कुटरवाले बर्याचदा सायकलचाच मार्ग वापरतात. त्यामुळे सायकल चालवावी की नाही अस वाटायला लागते.  सायकलींचे भवितव्य असुरक्षित वाटायला लागले आहे. त्याचबरोबर एखादी स्कुटर,सायकल मार्गावर आली तर तिला रस्त्यावरून खाली उतरण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे गाडीवालेही सायकलचाच मार्ग वापरतात. -  श्रीकृष्ण कानेटकर,  नागरिक *वाहतुकीचे नियम पाळण्याची लोकांची मानसिकता तयार होणं खूप गरजेचं आहे.पदपथावरून चालत असतांना बर्याचदा गाड्यांमुळे तारेवरची कसरत करावी लागते.अशावेळी हा मार्ग पादचायार्साठी की गाड्यांसाठी असा प्रश्न पडतो.याची तक्रार आम्ही करायची तरी कुणाकडे. - समिक्षा आव्हाळे, विद्यार्थीनी 

* फुटपाथवरुन  गाड्या जातात तेव्हा आम्ही त्यांना पेव्हर ड्रायव्हींग या नियमानुसार २०० रुपये  दंड आणि पार्किंग केल्यास १००० रू. दंड लावतो. लोकांना पथावरून चालता यावे याकरिता काळजी घेतो. - प्रमोद कोकणे,  पोलिस कर्मचारी वाहतूक शाखा* अपघाताचा धोका वाढला फर्ग्युसन महाविद्यालय ते म्हसोबा गेट दरम्यान पादचा-यांना फुटपाथवरून जाताना, वाहन चालकांच्या बेकायदेशीर ड्रायव्हिंगमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.  एकीकडे  वाहतूक कोंडीमुळे त्रास व दुसरीकडे दुचाकीची पार्किंग फुटपाथ केलेली असल्यामुळे अडचण होऊन धावपाळीच्या वेळी नागरिकांना फूटपाथवरून खाली उतरुन आपघाताला सामोरे जावे लागते. मात्र यासगळ्यात ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुळे यांना रस्ता ओलांडणे अवघड होत आहे.  

टॅग्स :PuneपुणेParkingपार्किंगtwo wheelerटू व्हीलरtraffic policeवाहतूक पोलीस