शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या नातेवाइकांची डॉक्टरला धक्काबुक्की

By admin | Updated: July 17, 2015 03:44 IST

मेंदूत गाठ झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया दोन वेळा पुढे ढकलली. तिसऱ्यांदा असाच प्रकार घडला. त्यामुळे रुग्णाच्या चिडलेल्या नातेवाइकांनी वायसीएम रुग्णालयाचे

पिंपरी : मेंदूत गाठ झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया दोन वेळा पुढे ढकलली. तिसऱ्यांदा असाच प्रकार घडला. त्यामुळे रुग्णाच्या चिडलेल्या नातेवाइकांनी वायसीएम रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ. अमित वाघ यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. महापालिका वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॉ. वाघ यांची भेट घेतली. धक्काबुक्की करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे. डॉक्टरांवरील हल्याच्या घटनेचा विविध संंघटनांनी निषेध नोंदवला आहे.आळेफाटा येथील रहिवासी असलेल्या गंगूबाई लक्ष्मण थोरात (वय ६५, रा. आळेफाटा) यांच्या मेंदूत गाठ झाली आहे. त्यांना १८ जून २०१५ला संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करून घेतले. मात्र, वेळोवेळी विविध कारणे सांगून शस्त्रक्रियेसाठी विलंब करण्यात आला. गुरुवारी, १६ जुलैला सकाळी १० वाजता शस्त्रक्रिया निश्चित झाली होती. परंतु, दुसऱ्याच रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी नेले. ही शस्त्रक्रिया का केली नाही, असे विचारण्यास गेलेल्या थोरात यांच्या नातवाइकांना डॉक्टरांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुुळे संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांंनी डॉक्टर वाघ यांना धक्काबुक्की केली. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. रुग्ण महिलेचा मुलगा भीमा थोरात (वय ४०) यांनी डॉक्टरांना धक्काबुक्की केली. डॉक्टरांकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. वारंवार विनंती करूनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे हा प्रकार घडला, असे रुग्ण महिलेची मुलगी सुवर्णा घागरे यांनी सांगितले. या घटनेनंतर महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, तसेच वैद्यकीय अधीक्षक मनोज देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी त्वरित वायसीएमला भेट दिली. डॉ. वाघ यांच्याशी चर्चा करून झालेल्या घटनेची माहिती घेतली. (प्रतिनिधी)आरपीआयचे अजिज शेख, सामाजिक कार्यकर्ते भीमराव तुरुकमारे, श्याम उनवणे, सिद्धार्थ निंबाळकर यांनी डॉक्टरवरील हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. वासीएमचे डॉक्टर काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार असल्याचे निवेदन वैद्यकीय विभागाने दिले आहे.