बनावट कागदपत्रांद्वारे विदेशींना पासपोर्ट! टोळ्या सक्रिय; घुसखोरांच्या अटकेनंतर माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 11:32 AM2023-12-30T11:32:38+5:302023-12-30T11:32:51+5:30

परदेशी नागरिकांना पारपत्र मिळवून देणाऱ्या टोळ्या...

Passport to foreigners through fake documents! gangs active; Information revealed after the arrest of the intruders | बनावट कागदपत्रांद्वारे विदेशींना पासपोर्ट! टोळ्या सक्रिय; घुसखोरांच्या अटकेनंतर माहिती उघड

बनावट कागदपत्रांद्वारे विदेशींना पासपोर्ट! टोळ्या सक्रिय; घुसखोरांच्या अटकेनंतर माहिती उघड

पुणे : शहर व परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. यात बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे दहा पासपोर्ट काढल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीप्रकरणी हडपसर, वानवडी, भारती विद्यापीठ, फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून २९ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती. कारवाईनंतर पोलिसांनी बांगलादेशींची चौकशी केली. तेव्हा बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी दहा पासपोर्ट काढल्याचे उघडकीस आले. याची पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. सहायक पोलिस आयुक्त रमाकांत माने आणि पुणे पोलिसांच्या पासपोर्ट पडताळणी विभागातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी पासपोर्ट पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परदेशी नागरिकांना पारपत्र मिळवून देणाऱ्या टोळ्या

परदेशी नागरिकांना भारतीय पारपत्र मिळवून देणाऱ्या टाेळ्या सक्रिय असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पारपत्र मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची व्यक्तिगत चौकशी करावी. तसेच अर्जदार नागरिकांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करावी. परिसरातील नागरिकांकडे वास्तव्याबाबत चौकशी करण्यात यावी, असे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. आधारकार्ड, जन्म दाखला, तसेच अन्य आवश्यक कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणाने करावी, असेदेखील पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

Web Title: Passport to foreigners through fake documents! gangs active; Information revealed after the arrest of the intruders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.