बंगळुरूला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 09:55 IST2025-11-04T09:55:11+5:302025-11-04T09:55:20+5:30
पुणे विमानतळावरून रविवारी साडेआठच्या सुमारास बंगळुरूसाठी आकासा एअरचे (एआर क्यूपी १३१२) हे विमान उड्डाण करणार

बंगळुरूला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल
पुणे : पुण्याहून रविवारी बंगळुरूला जाणारे विमान अचानक रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. विमान अचानक रद्द करण्याचे कारण विमान कंपनीकडून देण्यात आले नाही.
पुणेविमानतळावरून रविवारी साडेआठच्या सुमारास बंगळुरूसाठी आकासा एअरचे (एआर क्यूपी १३१२) हे विमान उड्डाण करणार होते. या विमानात १०० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. यासाठी दोन तास आधी प्रवासी पुणे विमानतळावर दाखल झाले. पण, विमान काही सुटले नाही. प्रवाशांनादेखील काहीही सांगण्यात आले नाही. प्रवाशांनी चौकशी केल्यानंतर विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली.
अचानक विमान रद्द झाल्यामुळे बंगळुरूला निघालेल्या प्रवाशांची गैरसोय झाली. याबाबत विमान कंपनीकडून प्रवाशांची कोणतीही सोय करण्यात आली नाही. प्रवाशांनी विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.