शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पुण्यात २० रुपयासाठी रिक्षाचालकाने केला प्रवाशाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 16:45 IST

अवघ्या २० रुपयांच्या वादामुळे प्रवाशाचा खून करण्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.शहरातील रविवार पेठ भागात शनिवारी ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.

ठळक मुद्दे२० रुपये नसल्याने केला प्रवाशाचा खून, पुण्यातल्या रिक्षाचालकाला अटकआरोपींनीच नेले जखमीला रुग्णालयात, मात्र उपचारापूर्वीच मृत्यू

पुणे : अवघ्या 20 रुपयाच्या वादातून रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना रविवार पेठ भागात शनिवारी घडली आहे.  तानाजी धोंडीराम कोरके असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अतुल उर्फ ईश्वर हराळे व रोहन गोडसे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  मयत तानाजी कोरके रिक्षा चालक अतुल उर्फ ईश्वर हराळे याच्या रिक्षात पुणे स्टेशनपासून बसला तो रविवार पेठ व गणेश पेठ दरम्यान उतरला.  त्यावेळी मीटरनुसार रिक्षाचे भाडे एकूण ४० रुपये झाले होते. मात्र तानाजी यांच्याकडे २०रुपयेच असल्याने वादाला सुरुवात झाली. त्यानंतर आरोपींनी साथीदारांच्या मदतीने तानाजीला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. काही वेळांनी पोलिसांना घटना समजताच त्यांनी आरोपीच्या रिक्षातून त्याला ससून हॉस्पिटलला उपचारासाठी नेले, मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. अखेर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर फरासखाना पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.दरम्यान तानाजी हा मूळ लातूरचा रहिवासी असून गेले आठ वर्ष पुण्यात राहत असल्याचे समजते. अवघ्या वीस रुपयांसाठी जीव गेलेल्या या निर्दयी प्रकारची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcrimeगुन्हेMurderखून