शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी बसमधील वाढत्या चोऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये वाढतेय धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 13:51 IST

चोरींच्या घटनांनी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

ठळक मुद्देनागरिकांकडून चोरांना तत्काळ अद्दल घडवण्याची मागणी आठवड्यातून किमान तीन ते चार तक्रारी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल

पुणे : दिवसेंदिवस बसमधील वाढलेल्या चोरींच्या घटनांनी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकीकडे पोलिसांनी बसस्थानकांवर सुरक्षा वाढवली असली तरी चोरीच्या घटनांमध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. चोरांना पोलिसांचे भय नसून ते मोकाटपणे नागरिकांना लुबाडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पीएमपीमधील वाढलेल्या या चोरीच्या घटनांवर मार्ग काढत चोरांना तत्काळ अद्दल घडवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हडपसर भागातील रहिवासी सुनंदा राऊत (वय ६४) या हडपसर ते आळंदी मार्गावरील बसमधून दोन दिवसांपूर्वी प्रवास करत होत्या. बस प्रवासात चोरट्यांनी राऊत यांच्या हातातील सोन्याची बांगडी कटरने तोडली. चोरलेल्या बांगडीची किंमत ४५ हजार रुपये असल्याचे राऊत यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अशाच प्रकारची घटना शनिवारी (दि. ३) घडली. वारजे ते सेनापती बापट रस्ता या मार्गावरील बसमधून प्रवास करणाºया अंबुबाई धुमाळे (वय ७८, रा. खडकवासला) यांच्या हातातील ५५ हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविली. सेनापती बापट रस्त्यावरील  थांब्यावर उतरत असताना गर्दीत ही घटना घडली. धुमाळे यांनी याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस हवालदार एम. बी. बोरसे तपास करीत आहेत. मागील दोन ते तीन महिन्यांपासून पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. बाहेरगावाहून आलेले प्रवासी, महिला, विशेषत: ज्येष्ठ महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. ......पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलांवर पाळत ठेवत गर्दीच्या वेळी ज्येष्ठ महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या तसेच पाटल्या या प्रकारचे दागिने कटरच्या सहाय्याने कापून नेली. त्याबरोबरच पिशवीतील दागिने, खिशातील रोकड लांबविण्यात आली आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवासी चिंतेत आहेत. गेल्या काही महिन्यात पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या गुन्ह्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आठवड्यातून किमान तीन ते चार तक्रारी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलtheftचोरीWomenमहिलाGoldसोनंNayana Gundeनयना गुंडे