पोलीस अधिकाऱ्याने पार्किंगमध्ये झोपलेल्यांच्या अंगावर घातली गाडी, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:38 IST2018-03-06T00:35:39+5:302018-03-06T00:38:53+5:30
कर्वेनगर येथील संकल्प सोसायटीच्या पार्किंगमध्ये झोपलेल्या दोघांच्या पायावर एका पोलीस अधिका-याने गाडी घातल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

पोलीस अधिकाऱ्याने पार्किंगमध्ये झोपलेल्यांच्या अंगावर घातली गाडी, दोघे जखमी
पुणे - कर्वेनगर येथील संकल्प सोसायटीच्या पार्किंगमध्ये झोपलेल्या दोघांच्या पायावर एका पोलीस अधिकाºयाने गाडी घातल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्वेनगरमधील गिरीजा शंकर सोसायटीशेजारील संकल्प सोसायटीच्या पार्किंगमध्ये स्वामी समर्थाचे दोघे भक्त झोपले होते. सातारा येथील पोलीस अधिकारी रात्री साडेदहाच्या सुमारास आपली पांढरी कार घेऊन पार्किंगमध्ये आले. कार पार्क करताना त्यांनी झोपलेल्या या दोघांच्या पायावर गाडी घातली व ते वरती निघून गेले. तेव्हा इमारतीतील लोकांनी आरडाओरडा केला. शेवटी काही मुलांनी गाडी पुढे ढकलून या दोघांची सुटका केली व त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. याची माहिती मिळाल्यावर कर्वेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सोसायटीत आले़ ते या अधिका-याच्या घरी गेले. जमलेल्या लोकांना त्यांनी हुसकावून लावले़ याबाबत चौकशी करता किरकोळ प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.