पिलाणवाडीतही बिबट्याची दहशत

By Admin | Updated: January 5, 2015 23:06 IST2015-01-05T23:06:12+5:302015-01-05T23:06:12+5:30

पिलाणवाडी (ता. दौंड) येथील ववलेवस्ती येथे बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यात एक वर्षाच्या वासराचा मृत्यू झाला.

Panic Panic in Pilibhav | पिलाणवाडीतही बिबट्याची दहशत

पिलाणवाडीतही बिबट्याची दहशत

हल्ल्यात वासरू ठार
राहू : पिलाणवाडी (ता. दौंड) येथील ववलेवस्ती येथे बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यात एक वर्षाच्या वासराचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांपूर्वी राहू दत्तनगर या ठिकाणी चार शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्या होत्या. या घटनांमुळे या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
या परिसरातील अनेकांनी दहिटणे ते राहूगाव मुळा मुठा नदीकाठच्या जंगलामध्ये बिबट्या दिसल्याचे सांगितले आहे. परंतु याची दखल घेतली गेली नाही. अशा घटना घडल्या की वनविभागाचे अधिकारी येतात. पंचनामा करतात. त्या ठिकाणी पिंजरा लावतात. परंतु, अद्याप वन विभागाच्या सापळ्यात बिबट्या सापडला नाही.
राहू-शिंदेनगर येथील ऊसतोडणीच्या फडामध्ये एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. जवळच असलेल्या ग्रामस्थांनी धाव घेतल्याने ही ऊसतोड करणारी महिला वाचली, असे येथील ऊसतोड मजुरांनी सांगितले.

 

Web Title: Panic Panic in Pilibhav