शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी उद्यान दत्तक...!

By admin | Updated: January 26, 2015 01:44 IST

वृक्षतोड, पक्ष्यांच्या निवाराच्या समस्या, पक्षिनिरीक्षण केंद्र व अभयारण्य ओस पडत चालली असताना पाषाण येथील वृक्षप्रेमी किसन गारगोटे व डॉ. विद्या गारगोटे

बेनझीर जमादार, पुणेवृक्षतोड, पक्ष्यांच्या निवाराच्या समस्या, पक्षिनिरीक्षण केंद्र व अभयारण्य ओस पडत चालली असताना पाषाण येथील वृक्षप्रेमी किसन गारगोटे व डॉ. विद्या गारगोटे या दाम्पत्याने पंचवटी उद्यान दत्तक घेऊन त्याचा सांभाळ करण्याचा एक नवा आदर्श समाजाला घालून दिला आहे.गारगोटे यांनी अंदाजे साठ एकर जागेत ३१५० वृक्ष लागवड करण्याचा यशस्वी प्रकल्प केला आहे. याठिकाणी त्यांनी पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी सहा पाण्याची तळी, पाण्याच्या टाक्या, टाक्यांमध्ये पाणी जाण्यासाठी अंतर्गत पाइपलाईन, ठिबक सिंचन, प्रत्येक झाडांना आधार म्हणून बाबूंची काठी, पक्ष्यांसाठी महिन्याला शंभर किलो धान्य व त्यासाठी लागणाऱ्या चार मोठ्या आकाराच्या पराती, वृक्ष लागवडीसाठी व जोपासण्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून घोषवाक्यासह सहा फलक बसविण्यात आले आहेत. तसेच इलेक्ट्रिक पंपाच्या विजेच्या पुरवठ्याची व्यवस्था त्यांनी स्वत:च्या घरातून केली आहे. विनोद राठोड व विनायक राठोड यांची झाडांना पाणी देण्यासाठी व संरक्षणासाठी रोजंदारीने कायमस्वरूपी नेमणूकदेखील केली आहे.तसेच प्रत्येक झाडांना योग्य प्रमाणात खताचा पुरवठा करणे व डोंगरावरील झुडपे व इतर उपद्रवी झाडे छाटणे व प्रसंगी काढून टाकणे ही कामेदेखील पूर्ण करण्यात येणार आहे. मूळचे खेडचे असणाऱ्या या दाम्पत्यांना लहानपणापासून झाडे, प्राणी, पक्षी यांची आवड आहे. त्यांनी कित्येक जंगलांची सफारीदेखील केली आहे. गेली दोन वर्षे पंचवटी भागात राहणाऱ्या या गारगोटे कुटुंबांना ही आपली आवड स्वस्थ बसू देईनात, या विचाराने त्यांनी घरालगत असणाऱ्या पालिकेच्या पंचवटी उद्यानात पहिल्यांदा शंभर झाडे लावू का, अशी विनंती अधिकाऱ्यांना केली. यानंतर त्यांनी हा छंद जोपासत ३१५० आकडा पार केला. नुकतेच या उद्यानाला पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, मुख्य वनरक्षक सत्यजित गुजर यांनी भेट दिली.