पोखरी घाटात पुन्हा दरड कोसळली; गाड्या चालवताना काळजी घेण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 14:33 IST2022-07-11T14:29:41+5:302022-07-11T14:33:16+5:30
अजूनही मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची शक्यता....

पोखरी घाटात पुन्हा दरड कोसळली; गाड्या चालवताना काळजी घेण्याचे आवाहन
पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या पोखरी घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. मागील वर्षी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, त्याच ठिकाणी पुन्हा दरड कोसळली असून इथे अजूनही मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंबेगाव तालुक्यातून श्री क्षेत्र भीमाशंकर कडे जाणाऱ्या पोखरी घाटात आज पुन्हा दरड कोसळली आहे. मागील वर्षी ज्या ठिकाणी घाटातील वरची बाजू तुटून मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती त्याच ठिकाणी आज पुन्हा दरड कोसळली आहे. दरडीचा राडारोडा व मोठे दगड माती रस्त्यावर आल्याने येथे वाहतुकीस अडथळे दूर झाले आहेत.
सध्या या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून या घाटातून प्रवास करताना काळजी घेण्याची आवश्कता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडूनही चालकांना गाड्या चालवताना काळजी घेण्याचे आवाहन केले गेले आहे.