अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
अचानक लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. खेड तालुक्यातील कोहिंडे येथील रौधळवाडी येथे रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत यांचे २ लाख हजार रुपयांचे नुकसान झाले. ...
कमी मोबदला देण्यासाठी चक्क एका शेतकरी महिलेच्या सातबारा उताऱ्यावरील डाळिंबाच्या पिकाची नोंदच कषि अधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली आहे. डाळिंबाच्या ऐवजी उसाची नोंद केल्याने या महिलेला कमी मोबदला मिळाला. ...
तरुणांनी महापुरुषांचे विचार स्वीकारून विचारनिष्ठ झाले पाहिजे. असंघटित समाज हा बळी जाणारा समाज आहे. त्यांना संघटीत केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. मा. म. देशमुख यांनी केले. ...
श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने चिंचवडमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्सवाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत चार मार्चला मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात तानाजी मालुसरे, येसाजी कंक, खंडेराव दाभाडे, व्यंकोजी शिरोळे यांचे वंशज सहभागी होणार आहेत. ...
तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर, काही दिवसांतच या शिस्तीला हरताळ फासला जाऊ लागला आहे. काही वाहक व चालक निर्धास्त झाले असून, पुन्हा बेशिस्त सुरू झाल्याचा अनुभव प्रवाशांना येऊ लागला आहे. ...
पुणे शहराला समान व २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यामध्ये येणारे अडथळे व पिंपरी-चिंचवड येथील बांधकामे नियमित करण्याबाबत अधिवेशनात प्रश्न मांडणार असल्याचे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. ...
प्रक्रिया सुरू करून आठ वर्षे होत आली तरीही सरकारने भाषा धोरण जाहीर केलेले नाही, असा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपस्थित केला आहे. ...
देशात शिक्षण आणि रोजगाराची परिस्थिती भयानक होत चालली आहे, अशी खंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस नरसय्या आडम यांनी व्यक्त केली. साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ...
मुक्तछंद संस्थेतर्फे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक पं. गुलाम दस्तगीर बिराजदार, प्रसिद्ध लेखक वसंत लिमये, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुनील केशव देवधर आणि चित्रकार नीलेश जाधव यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती ...