शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

Oxygen crisis : ऑक्सिजन तुटवड्याचा कॅन्टोन्मेंट रुग्णालयाला फटका; नवीन रुग्णांचे अ‍ॅडमिशन थांबवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 9:12 PM

पुणे कॅन्टोन्मेंट रुग्णालयात नवीन ऍडमिशन थांबवल्या. नवीन ऑक्सिजन मिळायला लागतायत तीन दिवस

पुणे : पुण्यातल्या ऑक्सिजन उपलब्धतेचा प्रश्न सुटायला तयार नाहीये. याचा मोठा फटका आता पुणे कॅन्टोन्मेंट मधल्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाला बसला आहे. ऑक्सिजन उपलब्धता अगदी थोडी असल्याने या रुग्णालयाने पेशेंट ने पेशेंट घेणे थांबवले आहे. जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठ्याची सोय होत नाही तोपर्यंत पेशंट ठेवणं हे धोक्याचे ठरणार असल्याचा दावा कॅन्टोन्मेंटचा अधिकाऱ्यांनी केला आहे. 

पुण्यात गेले काही दिवस ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. त्याचाच फटका आता कॅन्टोन्मेंटचा सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाला बसायला लागला आहे. प्रयत्न करून ही पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे आता या रुग्णालयाला नवीन रुग्ण घेणं थांबवण्याची वेळ आली आहे. एकीकडे अनेक खासगी रुग्णालयांनी पेशंट घेणं थांबवलेल असताना आता सरकारी रुग्णालयात देखील ही परिस्थिती ओढवली आहे. 

पटेल रुग्णालयात पुणे महापालिका आणि कॅंटोन्मेंट चे रुग्ण उपचार घेत आहेत. आयसीयू व्हेंटिलेटर सहीत सुसज्ज असलेले हे रुग्णालय मोठा आधार ठरला होता. मात्र आता ऑक्सिजन चा तुटवड्याचा मोठा फटका या रुग्णालयाला बसलेला दिसतो आहे. 'लोकमत' शी बोलताना कॅन्टोन्मेंट चे सीईओ अमित कुमार म्हणाले " ऑक्सिजन पुरवठा पुरेसा होत नाहीये. तीन दिवसांपूर्वी नगर ला पाठवलेला ऑक्सिजन टँकर आता भरून येत आहे. सध्या चा परिस्थिती मध्ये रिस्क घेणं शक्य नाहीये. त्यामुळे सध्या जेवढे रुग्ण आहेत त्यांच्यावरच उपचार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आम्ही सोय करत आहोत. मात्र तोपर्यंत नवीन पेशंट घेणं थांबवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे."  

टॅग्स :pune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्डOxygen Cylinderऑक्सिजनPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस