शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

सोशल मीडियाचा अतिवापर : ८ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांबाबत पालकांच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 02:34 IST

मुलांमधील ‘स्क्रीन अ‍ॅडिक्शन’ मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. पालकांना प्रशिक्षित करणे, जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे.

- लक्ष्मण मोरेपुणे : मुलांमधील ‘स्क्रीन अ‍ॅडिक्शन’ मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. पालकांना प्रशिक्षित करणे, जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे. पालकांकडून ८ ते १६ आणि १६ ते २५ या वयोगटातील मुलांबाबत सर्वाधिक तक्रारी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राकडे नोंदविलेल्या आहेत. मागील एक महिन्यात आनंदवनच्या मनोविकास कक्षामध्ये झालेल्या ओपीडींमध्ये सर्वाधिक संख्या मुलींची आहे.सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे मुलांमध्ये खोटे बोलण्याची सवय मोठ्या प्रमाणावर जडू लागली आहे. आपण जे नसतो ते दाखविण्याचीही नवी पद्धत या मुलांमध्ये रूढ होऊ लागली आहे. पालकांनी ठरविले तर या नव्या व्यसनाला आळा घालणे शक्यआहे. त्यासाठी शाळा-पालक-बालक असा त्रिकोण साधणे आवश्यकआहे.आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राकडून पालकांमधील जनजागृतीसाठी पालक कट्टा आणि मनोविकास ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. पालकांचे प्रबोधन, व्यसनमुक्ती आणि व्यसन जडूच नये, याकरिता कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. आजाराची लक्षणे सांगितली जात आहेत. मुळात पालकांचीच जबाबदारी वाढली आहे. त्यांना याबाबतचे गांभीर्य लक्षात आणून देणे आवश्यक आहे.मुलांचे मोबाईल तपासणे, त्यांचे सोशल मीडियावर कोणते मित्र आहेत, कोणते ग्रुप आहेत याबाबतची माहिती पालकांनी ठेवणे अत्यावश्यक बनले आहे. मुलांच्या मोबाईलमध्ये किती मोबाईल इंटरनेट डाटा असतो, त्याचा वापर किती आणि कसा होतो याविषयीचे भान बाळगणेही गरजेचे आहे. मुलांसोबतचा खुला संवादही गरजेचा आहे. आभासी विश्वाची जाणीव मुलांना करून देण्यासोबतच त्यांच्यासोबत अधिकाधिक वेळ घालविणे ही काळाची गरज बनली आहे. नातेसंबंधाबाबतचे मौलिक शिक्षणही आवश्यक आहे.सोसायटींमध्ये पालक कट्टे सुरू...आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राकडून शहरातील विविध भागांमधील सोसायट्यांमध्ये पालक कट्टे सुरू करण्यात आले आहेत. विविध संस्था, संघटना, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ, महिला समित्या, प्रभागस्तरीय समित्या, शाळांमधील पालक संघ यांची मदत घेतली जात आहे.सोसायटीच्या पदाधिकाºयांना भेटून संस्थेचे पदाधिकारी संकल्पना समजून सांगत आहेत. पालकांनी काय काळजी घ्यावी, त्यांच्यामध्ये जनजागृतीची असलेली आवश्यकता, मुले व्यसनाकडे आकर्षित होताहेत का, हे ओळखण्यासाठीची लक्षणे याची माहिती पालकांना दिली जात आहे.व्यसनांपासून मुलांना परावृत्त करणे हा एक भाग यामागे आहे. मात्र, मुले व्यसनाधीन होऊच नयेत, याकरिता नेमके काय करावे, याचेही प्रशिक्षण पालकांना दिले जात आहे.1 पालकांनी मनोविकास कक्षात गेल्या एक महिन्यात केलेल्या फोन कॉल्समध्ये ८ ते १६ वयोगटातील मुलांसाठी चौकशी केलेले १८७, १६ ते २५ वयोगटातील मुलांसाठी चौकशी केलेले १४० कॉल्स होते.2एक महिन्यामध्ये कक्षात घेण्यात आलेल्या ओपीडींमध्ये (बाह्य रुग्ण तपासणी) ४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी २३ मुले १६ ते २५ वयोगटातील होती. तर २४ मुले ८ ते १६ या वयोगटातील होती. या ४७ रुग्णांमध्ये मुलींची संख्या ३४ आहे.आम्ही ‘स्क्रिन अ‍ॅडिक्शन’वर उपायांसाठी मनोविकास हा कक्ष सुरू केला आहे. तक्रार आणि उपचार यामध्ये संवाद हा दुवा ठरू शकतो. या ठिकाणी मुलांचे आणि तरुणांचे समुपदेशन केले जाते. रुग्णांना ३० प्रश्नांची प्रश्नावली दिली जाते. त्याच्या उत्तरांमधून रुग्णाचा कल आणि त्याचाही नेमका अंदाज येतो. गेम्स, सोशल मीडिया, पॉर्न साईट्स आदी विषयीच्या त्याच्या संकल्पना स्पष्ट होतात. आवश्यकता वाटल्यास आम्ही त्याच्यावर मानसोपचार करतो. २०२५ पर्यंत देशातील २५ टक्के जनतेला मानसोपचारांची आवश्यकता भासेल असे सध्याचे चित्र आहे. - डॉ. अजय दुधाणे, प्रमुख, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया